मुंबई - The archies : 'द आर्चीज' हा चित्रपट अलीकडेच नेटफ्लिक्सवरह प्रदर्शित झाला. या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, डॉट, वेदांग रैना आणि युवराज मेंडा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 'द आर्चीज' चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरनं केलंय. झोयानं एका संवादादरम्यान या चित्रपटाच्या कास्टिंग प्रक्रियेबद्दल आणि नवोदितांना दिलेल्या मानधनावर चर्चा केली आहे. झोयानं यावेळी सांगितलं की, चित्रपटातील प्रत्येक कलाकारांना अनेक ऑडिशन्सचा सामना करावा लागला असल्याचा तिनं उघड केलं.
झोया अख्तरची मुलाखत : एका मुलाखतीत झोयाला विचारलं की, 'तुम्ही या चित्रपटासाठी मुलांना किती पैसे दिले. तेव्हा तिनं सांगितलं, "मी तुम्हाला ते आकडे सांगू शकत नाही." यानंतर तिथे उपस्थित असलेल्या निर्मात्या रीमा कागती या म्हणाल्या की, ''हे सर्व कलाकार एकाच श्रेणीतील आहेत.'' यानंतर झोयानं सांगितलं की, ''सातही कलाकारांना आम्ही समान मानधन दिलं आहे.'' 'द आर्चीज'मधील झोयाच्या कास्टिंग निवडीमुळे पुन्हा एकदा नेपोटिझम वाद निर्माण झाला होता. स्टार किड्सवर निर्मित असलेला हा चित्रपट अनेकांना आवडला आहे. हा चित्रपट रिलीजपूर्वी खूप चर्चेत होता. 'द आर्चीज' हा म्यूझिकल चित्रपट नेटफ्लिक्सवर 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.