मुंबई - Honey Singh Post : हिंदी चित्रपटसृष्टीची 'लेडी दबंग' सोनाक्षी सिन्हाचा तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. सोनाक्षी आणि झहीर 23 जूनला लग्न करणार असल्याचं समजत आहेत. आतापर्यंत लग्नाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता रॅपर हनी सिंगनं सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची बातमी खरी असल्याचं सिद्ध केलं आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो नक्कीच सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचं म्हणत आहे.
हनी सिंगनं सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दल केली पोस्ट :हनी सिंगनं काल रात्री एक इन्स्टास्टोरी शेअर करत लिहिलं, "मी माझे पहिले गाणे लंडनमध्ये शूट करणार आहे, मात्र मी तुम्हाला खात्री देतो की, मी माझी सर्वात चांगली मैत्रीण सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात नक्की येईन, कारण तिनं माझ्या करिअरमध्ये आणि कठीण काळात मदत केली आहे. सोना आणि झहीर या जोडप्याला माझ्या शुभेच्छा, भोलेनाथचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो." आता ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकजण सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत. याआधी सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं, मात्र त्यांना याबाबत काही माहित नसल्याचं सांगितलं होतं.