मुंबई-Kalki 2898 AD Plagiarism:साउथ सुपरस्टार प्रभास स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'कल्की 2898 एडी' रिलीज होण्याआधीच वादात अडकलेला दिसत आहे. हा चित्रपट 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. आता 'कल्की 2898 एडी' या चित्रपटावर हॉलिवूड चित्रपटामधील आर्ट वर्क चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉलिवूड चित्रपटांसाठी आर्ट वर्क करणारे प्रसिद्ध संग चोईनं 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी परवानगीशिवाय त्याचे आर्ट वर्क कॉपी केल्याचा आरोप केला आहे. संग चोईनं अलीकडील अनेक हॉलिवूड चित्रपटासाठी आर्ट वर्क केलं आहे. त्यांनी 'ड्यून और मैड मैक्स: फ्यूरी रोड' या हॉलिवूड चित्रपटासाठी काम केलं होतं.
'कल्की 2898 एडी' वादात अडकला :संग चोईनं'ड्यून और मैड मैक्स: फ्यूरी रोड' या चित्रपटामध्ये जे आर्ट वर्क केलं आहे तेच, 'कल्की 2898 एडी'मध्ये पाहायला मिळत असल्याचा आरोप त्यांनी केल्यानंतर आता पुन्हा एकदा हा चित्रपट वादात सापडला आहे. संग चोईनं 'कल्कि 2898 एडी'च्या निर्मात्यांवर प्लेगरिज्मचा आरोप केल्यावर चित्रपटाच्या रिलीजवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज अनेकजण लावत आहेत. 'कल्कि 2898 एडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा त्याची तुलना 'ड्यून और मैड मैक्स: फ्यूरी रोड' चित्रपटाशीही करण्यात आली होती. संग चोई हे सुपरहिरो चित्रपट निर्माते मार्वल स्टुडिओ, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्ससाठी काम करतात.