महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

टीव्ही अभिनेत्री हिना खाननं केमोथेरपीनंतर कापले केस, केली भावनिक पोस्ट शेअर - HINA KHAN HAIR CUT - HINA KHAN HAIR CUT

Hina Khan Hair Cut: टीव्ही अभिनेत्री हिना खाननं केमोथेरपीनंतर केस कापले आहेत. तिनं केस कापताना एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तिची आई तिला मिठी मारून रडताना दिसत आहे.

Hina Khan Hair Cut
हिना खाननं कापले केसं (हिना खान (फाईल फोटो) (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 3:01 PM IST

मुंबई - Hina Khan Hair Cut : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे. या कठीण प्रसंगातही तिनं आपले धैर्य कायम ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी, एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ती एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर केमोथेरपीसाठी रुग्णालयात जाताना दिसली होती. दरम्यान हिनानं तिचा एक व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. यात ती तिचे केस कापताना दिसत आहे. या व्हिडिओबरोबर तिनं एक नोटही शेअर केली आहे. हिना अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स देत असते.

हिना खाननं शेअर केली भावनिक पोस्ट : आज 4 जुलै रोजी व्हिडिओ पोस्ट शेअर केल्यानंतर तिचे चाहते आता भावूक झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "तुम्ही काश्मीरमध्ये माझ्या आईचा आक्रोश ऐकत आहात खरं तर तिचा आशीर्वाद माझ्यामागे आहे. कारण ती सर्व पाहण्यासाठी स्वत:ला तयार करत आहे, याबद्दल तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. यानंतर तिनं पुढं लिहिलं, "सर्व सुंदर लोकांसाठी, विशेषत: ज्या महिला कॅन्सरशी लढत आहेत, ही वेळ कठीण आहे. मला माहीत आहे की प्रत्येक महिलांसाठी आपले केस हे मुकुटाप्रमाणे असतात. हा मुकुट आपण कधीही काढत नाही. तुम्हीला अशा लढाईचा सामना करायचा असेल तर केस गमवावे लागतील. तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. मी विजय निवडला आहे. "

हिना खान देत आहे कॅन्सरशी झुंज : यानंतर तिनं पुढं लिहिलं, "ही लढाई जिंकण्यासाठी मी स्वत:ला प्रत्येक संभाव्य संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. माझे सुंदर केस कापण्याआधी मला या आठवड्यात माझे मानसिक आरोग्य बिघडवून घ्यायचे नव्हते म्हणून, मी माझा मुकुट काढण्याचा निर्णय घेतला. कारण मला समजलं की, खरा मुकुट हा माझे धैर्य आहे, माझी शक्ती आणि माझे स्वतःवरील प्रेम आहे." हिनानं पुढे लिहिलं, "मी विग बनवण्यासाठी माझे केस वापरण्याचा निर्णय घेतला आहे. केस परत वाढतील, भुवया परत वाढतील आणि जखमांचे डाग देखील जातील. मी माझी कहाणी आणि माझा प्रवास रेकॉर्ड करत आहे. माझ्या कहाणीनं या हृदयस्पर्शी पण वेदनादायक अनुभवाचा एक दिवसही एखाद्यासाठी चांगला बनला तर ते फायदेशीर ठरेल. प्रत्येक कठीण प्रसंगी मला साथ देणाऱ्याचे खूप आभार." देव माझ्या वेदना कमी करो आणि आम्हाला जिंकण्याची शक्ती देवो. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा." हिनाला काही दिवसांपूर्वी स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. 'संध्या' फेम ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास नारंग यांचं निधन, आज होणार अंतिमसंस्कार - Smriti Biswas Narang passed away
  2. तरुणाईमध्ये क्रेझ असलेला जस्टिन बीबर मुंबईत दाखल, अनंत अंबानीच्या संगीत समारंभात करणार गायन - JUSTIN BIEBER IN MUMBAI
  3. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून टीव्ही अभिनेता करण वाहीसह क्रिस्टल डिसूजा यांची चौकशी, नेमके कारण काय? - Karan Wahi and Krystle D Souza

ABOUT THE AUTHOR

...view details