मुंबई - Rama Navami 2024: देशभरात आज 17 एप्रिल रोजी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या पवित्र सणाचा आनंद हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्सही घेताना दिसत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ड्रीम गर्ल हेमा मालिनीनं अयोध्येतील राम मंदिरामधील श्रीरामाचा एक फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याशिवाय तिनं या पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आज राम नवमी आहे, आपण सर्वजण शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करूया आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करूया.''
राम नवमीच्या दिल्या बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा : यानंतर जॅकी श्रॉफला 22 जानेवारी 2024 चा दिवस आठवला आहे. त्यानं अयोध्येत रामाची सेवा करताना एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, 'सियावर रामचंद्र यांच्या राम नवमीच्या सर्वांना शुभेच्छा'. तसेच शिल्पा शेट्टीनं देखील तिच्या इन्स्टा स्टोरीवर श्रीरामचा एक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री कंगना रणौतनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अयोध्येतील राम मंदिराचा व्हिडिओ शेअर केला असून तिच्या चाहत्यांना शुभेच्छा देत पोस्टमध्ये लिहिलं, 'रामजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.' याआधी दुर्गा अष्टमीच्या मुहूर्तावर कंगनानं राम मंदिराची एक क्लिप पोस्ट केली होती आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होते की, '500 वर्षांनंतर हा शुभ मुहूर्त आला आहे, जेव्हा राम लल्ला पहिल्यांदाच त्यांच्या भव्य मंदिरात रामनवमी साजरी करत आहेत.'