मुंबई - Heeramandi Season 2 :दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची डेब्यू 'हिरामंडी: द डायमंड बाजार' वेब सीरीज खूप हिट झाली आहे. आता अनेकजण दुसऱ्या सीझनची आतुरतेनं वाटत पाहात आहेत. दरम्यान 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर लॉन्च झाल्यापासून वेब सीरीजच्या शानदार कामगिरीनंतर एक घोषणा करण्यात आली आहे. एका मुलाखतीत भन्साळी यांनी 'हिरामंडी'च्या पुढील भागासाठी योजना केल्याचं उघड केलय. आज, 3 जून रोजी भन्साळी प्रॉडक्शन आणि नेटफ्लिक्स इंडियानं 'हिरामंडी सीझन 2'ची घोषणा केली आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
'हिरामंडी : सीझन 2' येईल लवकरच :व्हिडिओ शेअर करताना भन्साळी यांनी लिहिलं, "मेहफिल पुन्हा जमेल, 'हिरामंडी: सीझन 2' लवकरच येईल." व्हिडिओमध्ये मुंबईतील कार्टर रोडवर अनारकली आणि घुंगरू परिधान केलेल्या सुमारे 100 डान्सर्स दिसत आहेत. या नृत्यांगना 'हिरामंडी' वेब सीरीजमधील 'सकल बन' आणि 'तिलस्मी बहें' या मिक्स गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी पीरियड-ड्रामा वेब सीरीजच्या दुसऱ्या सीझनबद्दल खुलासा करत पुढं सांगितलं, "वेब सीरीज बनवताना खूप काही लागतं. या वेब सीरीजमध्ये बरेच काही गेले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये गंगूबाई रिलीज झाल्यापासून, मी प्रत्येक दिवस काम केलं आहे. या वेब सीरीजची जबाबदारी खूप मोठी आहे."