मुंबई - Heeramandi First Look : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी'वेब सीरीजची वाट प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून पाहत आहेत. भन्साळी हे त्यांच्या भव्य सेट आणि पोशाखांसह उत्कृष्ट कहाणी पडद्यावर आणण्यासाठी ओळखले जातात. आता ते प्रेक्षकांसाठी 'हिरामंडी' घेऊन येत आहेत. या वेब सीरीजमध्ये 'हिरामंडी' नावाचे एक ठिकाण दाखवण्यात येणार आहे, जिथे वेश्या राहतात. या वेश्या इथे एखाद्या राणीप्रमाणे राज्य करत असतात. 1 फेब्रुवारीला स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी'चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
'हिरामंडी'चा फर्स्ट लूक रिलीज :फेब्रुवारीमध्ये, निर्मात्यांनी एक टीझर शेअर केला होता, ज्यामध्ये मनीषा कोईराला एका रॉयल गेटअपमध्ये जबरदस्त दिसत होती, त्यानंतर उर्वरित कलाकारांच्या अशाच हसमुख झलक दिसल्या होत्या. ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा,रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख यांच्या पात्रांचे शाही, सुंदर लूक दाखवण्यात आले होते. या अभिनेत्री या भव्य वेब सीरीजमध्ये हिरामंडी नावाच्या ठिकाणी राहणाऱ्या गणिकेच्या भूमिकेत दिसतील. भन्साळी वेब सीरीजद्वारे सर्वांना एका जादुई दुनियेत घेऊन जाणार आहेत. 1940च्या दशकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ही वेब सीरीज वेश्या आणि त्यांच्या ग्राहकांच्या कहाणीभोवती फिरणारी आहे. दरम्यान 'हिरामंडी'चा फर्स्ट लूक खूप जोरदार आहे.