मुंबई - Happy Birthday Sonakshi Sinha :अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या डेब्यू वेब सीरीजच्या यशाचा आनंद घेत आहे.'हीरामंडी'मधील 'फरीदान' या व्यक्तिरेखेला चांगला प्रतिसाद मिळत आज 2 जून रोजी तिचा 37 वा वाढदिवस आहे. दरम्यान कथित बॉयफ्रेंड बॉलिवूड अभिनेता जहीर इक्बालनं तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जहीरनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सोनाक्षीबरोबरचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "हॅपी बर्थडे सोनाज." फोटोमध्ये सोनाक्षी ही जहीरबरोबर खूप खुश दिसत आहे. आता सोनाक्षीचा हे फोटो पाहून अनेकजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
सोनाक्षी आणि जहीरच्या नात्याची अफवा :बर्थडे गर्ल सोनाक्षी सिन्हानेही जहीरच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोच्या कमेंट विभागात तिनं लाल हार्ट आणि हसरा चेहरा असलेले इमोजी शेअर केले आहेत. याशिवाय इतर चाहत्यांनीही दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सोनाक्षी आणि जहीरनं 'डबल एक्सएल' चित्रपटात एकत्र काम केलंय. एका संवादरम्यान जहीर म्हटलं होतं की, सोनाक्षीबरोबरच्या डेटिंग अफवांची तो पर्वा करत नाही. सोनाक्षी आणि जहीर खूपदा एकत्र स्पॉट होतात. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. याशिवाय सोनाक्षीच्या चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. अनेकदा सोनाक्षी जहीरबरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.