महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

धनुषच्या वाढदिवसानिमित्त 'कुबेर' निर्मात्यांनी केलं नवीन पोस्टर रिलीज, पाहा लूक - Dhanush Birthday - DHANUSH BIRTHDAY

Dhanush Birthday: धनुषचा आज वाढदिवस आहे. त्याचा आगमी चित्रपट 'कुबेर' सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान आज त्याच्या वाढदिवसानिमित्त 'कुबेर' निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर शेअर करून धनुषला शुभेच्छा दिल्या आहेत.

Dhanush Birthday
धनुषचा वाढदिवस ('कुबेर'मधून धनुषचं पोस्टर (@kuberathemovie Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 2:06 PM IST

मुंबई - Dhanush Birthday: साऊथचा सुपरस्टार-दिग्दर्शक धनुष आज 28 जुलै रोजी त्याचा 41वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, त्याचे अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय नुकतेच 'कुबेर' मेकर्सनं त्याच्या चित्रपटातील नवीन पोस्टर रिलीज करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता हे व्हायरल झालेलं पोस्टर अनेकांना आवडत आहे. या पोस्टरमध्ये धनुषच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. रविवारी 28 जुलै रोजी श्री वेंकटेश्वर सिनेमा एलएलपी प्रॉडक्शन हाऊसनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर धनुषचं नवीन पोस्टर शेअर करून त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे.

धनुषच्या वाढदिवसानिमित्त 'कुबेर'मधील पोस्टर रिलीज :या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "धनुष सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शेखर कम्मुलाच्या 'कुबेर'मध्ये आणखी उत्कृष्ट कामगिरी आणि संस्मरणीय क्षण पाहायला मिळतील." 'कुबेर'च्या नवीन पोस्टरमध्ये धनुषचा निरागस चेहरा दाखवण्यात आला आहे. पोस्टरमध्ये धनुषचा निरागसपणा आणि गरिबी त्याच्या अंगावरील फाटक्या आणि मळलेल्या कपड्यांवरून दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये धनुषचा वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'कुबेर' चित्रपटामध्ये गरीबीच्या समस्यांशी संघर्ष करताना धनुष दिसणार आहे. याआधी निर्मात्यांनी चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लुक शेअर केला होता. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता.

धनुषचं वर्कफ्रंट :यानंतर 'कुबेर' निर्मात्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये रश्मिका ही पैश्यानं भरलेली बॅग खड्ड्यातून काढते. आता या चित्रपटाची वाट अनेकजण खूप आतुरतेनं पाहत आहेत. 'कुबेर'बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन शेखर कम्मुलाला यांनी केलंय. यात नागार्जुन मुख्य भूमिकेत आहे. शेखर कम्मुलाचा 'कुबेर' हा श्री वेंकटेश्वरा सिनेमा एलएलपी आणि एमिगोस क्रिएशंसद्वारे निर्मित चित्रपट आहे. या चित्रपटाचं एकाच वेळी तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये शुटिंग केलं जात आहे. दरम्यान धनुषच्या आगमी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'इलायराजा', 'आयराथिल ओरुवन 2' आणि 'निलावुकु एन मेल एन्नाडी कोबाम ' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. साऊथ स्टार धनुषनं भिकाऱ्याच्या वेशात केलं सलग 10 तास शूट, समर्पण पाहून निर्मातेही झाले थक्क - South star Dhanush
  2. धनुष आणि रश्मिका मंदान्नाच्या 'कुबेर' अपडेटने सोशल मीडियावर धमाल - Kuber update

ABOUT THE AUTHOR

...view details