मुंबई - Happy Birthday Allu Arjun :अभिनेता अल्लू अर्जुनचे फक्त साऊथमध्येचं नाही तर देशभरात फॅन फॉलोअर्स आहेत. आज 8 एप्रिल रोजी अल्लू हा 42 वर्षांचा झाला आहे. दरम्यान या खास दिवशी अल्लू अर्जुनचे चाहते त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय काही चाहते त्याला भेटण्यासाठी त्याच्या घराबाहेर गर्दी करताना दिसले. आता सोशल मीडियावर अल्लू अर्जुनच्या घराबाहेरील काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी दिसत आहे. अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. याशिवाय त्याचे चाहते त्यावेळी पेपर पॉपर्सचे उधळण देखील करत आहेत.
अल्लू अर्जुनच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी : 'पुष्पराज' घरातून बाहेर पडताना पाहून चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठीजमलेले अनेक चाहते झाडावर चढले. चाहत्यांना शांत करण्यासाठी अल्लू अर्जुन पुन्हा एकदा घराबाहेर पडला आणि लोकांनी हात हलवून अभिवादन केलं. काळ्या टी-शर्ट, पांढऱ्या पॅन्ट आणि मॅचिंग सनग्लासेसमध्ये अल्लू खूपच देखणा दिसत होता. 42 व्या वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुन मध्यरात्री देखील घराबाहेर पडला होता. त्यानं त्याच्या चाहत्यांना भेट दिली होती. आता अल्लूचे व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. अनेकजण व्हिडिओ पाहून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.