महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पत्नी मान्यतानं 'बेस्टेस्ट हाफ' म्हणत संजय दत्तला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - maanayata dutt share post - MAANAYATA DUTT SHARE POST

Sanjay Dutt Bithday: संजय दत्तची पत्नी मान्यतानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर संजय दत्तचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

Sanjay Dutt Bithday
संजय दत्तचा वाढदिवस ((फाईल फोटो) (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 1:12 PM IST

मुंबई - Sanjay Dutt Bithday: अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. 'संजू बाबा' आज 29 जुलै रोजी आपला 65 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. दरम्यान, संजय दत्तची पत्नी मान्यतानं त्याला अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पतीच्या वाढदिवसानिमित्त जुन्या आणि सुंदर आठवणींचा कोलाज व्हिडिओ करून शेअर केला आहे. आता या कोलाज व्हिडिओमध्ये दोघे एकत्र खूप सुंदर आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मान्यतानं सुंदर मॅसेज लिहिला आहे.

मान्यता दत्तनं दिल्या संजय दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा : तिनं या पोस्टवर लिहिलं, "आनंदी... माझ्या सर्वोत्तम बेस्टेस्ट हाफला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यात निःस्वार्थ आणि बिनशर्त प्रेम करण्याची क्षमता आहे. माझी सर्वात मजबूत बाजू, तू केवळ माझ्यासाठीच नाही तर अनेकांसाठी मौल्यवान आणि विशेष आहेस, तुझ्यावर खूप प्रेम आहे." मान्यताच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेक चाहत्यांनी संजू बाबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्तची पत्नी मान्यता मुलांच्या शिक्षणामुळे दुबईत राहते. 'संजू बाबा' अनेकदा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी दुबईला जात असतो. मान्यता सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे, मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

संजय दत्तचं वर्कफ्रंट :दरम्यान संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो ॲक्शन-कॉमेडी 'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटामध्ये अजय देवगणबरोबर दिसणार आहे. आता नुकतेच दिग्दर्शक आदित्य धरबरोबर 'धुरंधर'मध्ये संजय दत्त काम करणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर रणवीर सिंग, यामी गौतम, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल हे कलाकार झळकणार आहेत. याशिवाय तो 'हाऊसफुल्ल 5', 'डबल आय स्मार्ट', 'राजा साब', आणि 'घुडचडी' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details