मुंबई - अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अरबाज खानबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर तिनं अर्जुन कपूरला डेट केलं. मात्र तिचं आणि अर्जुनचं नात फार काळ टीकू शकले नाही. मलायकाला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. त्याचं नाव अरहान खान असून ती त्याच्याबरोबर राहते. दरम्यान मलायकानं आता विवाहित महिलांना एक सल्ला दिला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं म्हटलं, 'इंडिपेंडेंट राहा.. जे तुमचे आहे, ते तुमचे असेल, जे माझे आहे, ते माझे असेल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याशी लग्न करता, तेव्हा तुम्ही सर्व काही करू इच्छित असता. याशिवाय तुम्ही परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करता. मला असं वाटतं की, तुम्ही तुमची ओळख बनवणे आवश्यक आहे.'
मलायका अरोरानं दिला विवाहित महिलांना सल्ला : यानंतर मलायकानं पुढं म्हटलं, "तुम्ही एकत्र काम करत आहात हे चांगले खरचं आहे, पण या अर्थ असा नाही की, तुम्ही तुमची ओळख पूर्णपणे नष्ट करा. दुसऱ्याचे आडनाव घेत आहे, तर किमान तुम्ही तुमचे बँक खाते वाचवा असं मला वाटते." मलायकानं विवाहित महिलांना एक चांगला सल्ला दिल्यानंतर आता ती सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनली आहे. घटस्फोट झाल्यानंतर मलायका ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसून ती छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये जज म्हणून दिसत असते. याशिवाय ती अनेकदा बॉलिवूडमधील पार्ट्या आणि अवार्ड शोमध्ये स्पॉट होते.
मलायका अर्जुनचं ब्रेक : मलायकाचं वैयक्तिक आयुष्य हे खूप गुंतागुंतीचं आहे . अरबाजबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर तिनं जेव्हा अर्जुन कपूरला डेट केलं, यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. कारण मलायका अर्जुनपेक्षा जवळपास 12 वर्षांनी मोठी होती. मात्र तरीही मलायकानं जगाची पर्वा न करता वर्षानुवर्षे अर्जुनला डेट केल. सुरुवातीला त्यांनी त्यांचं नातं खाजगी ठेवलं होतं, मात्र काही काळानंतर त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल पुष्टी केली. अनेकदा दोघेही कौटुंबिक समारंभमध्ये एकत्र दिसत होते. आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. अर्जुन कपूरनं नुकतेच सांगितलं, की तो आता सिंगल आहे. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यानं आपल्या नात्याबद्दल विधान केलं होतं.
हेही वाचा :