मुंबई - Guru Purnima 2024 : देशभरात आज 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. या शुभ प्रसंगी अभिनेत्री कंगना रणौतनं तिच्या चाहत्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनानं तिच्या बालपणीच्या गुरुची झलकही दाखवली आहे, ज्यांना ती आदर्श मानते. तिनं एक्सवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिनं यावर कॅप्शन दिलं, "जो लहानपणापासून माझा गुरु आहे, ज्यांनी मला नेहमी त्यांच्या आशीर्वादानं आणि शिकवणीनं मार्गदर्शन केलंय. आज मी रामकृष्ण मठात जाण्यासाठी पहाटे दिल्लीहून निघाले. स्वामी विवेकानंदजींनी मी प्रथम आशीर्वाद घेतला."
कंगना रणौत झाली ट्रोल : आपल्या गुरुंचा उल्लेख करत कंगनानं पुढं लिहिलं आहे की, "गुरुबद्दल काय सांगू, हे नरकासारखं जीवन फक्त गुरुंच्या चरणी बघूनच स्वर्ग बनतं, गुरुंचा आशीर्वाद सर्वांवर असो, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा." फोटोबद्दल बोलायचं झालं तर, "पहिल्या फोटोत स्वामी विवेकानंदांची झलक पाहायला मिळते. इतर फोटोत, कंगना पूजा केल्यानंतर तिच्या गुरुंचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. बेज आणि फिकट पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये कंगना ही आकर्षक दिसत आहे. आता कंगानानं शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलं, "मॅडम, मी ऐकलं होतं की, तुमचा फिल्मी गुरु आदित्य पंचोली होते? बरं गुरु हा गुरु असतो, नाही का?" आणखी एकानं लिहिलं, "देव तुम्हाला बुद्धी देवो."