मुंबई - Govinda dance : डान्सच्या बाबतीत गोविंदाचा हा अव्वल आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनं अनेक गाण्यावर डान्स परफॉर्मन्स दिला आहे. त्याचा डान्स अनेकांना आवडतो. वयाच्या 60व्या वर्षी देखील तो खूप सुंदर डान्स करतो. गोविंदा आपल्या नैसर्गिक प्रतिभेनं कोणत्याही गाण्यावर खूप सुंदर प्रकारे डान्स करतो. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मुलगा यशबरोबर स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. हा स्टेज 'इंडियन आयडॉल'चा होता आणि गोविंदा पत्नी सुनीता आणि मुलगा यशबरोबर या शोमध्ये आला होता. 'इंडियन आयडॉल'च्या शोमध्ये तो पाहुणा म्हणून आला होता.
गोविंदाचा डान्स :या शोमध्ये गोविंदा आल्यानंतर अनेकांनी त्याला डान्स करण्याची विनंती केली. यानंतर त्यानं यशबरोबर स्टेजवर जबरदस्त डान्स केला. या दोघांनी 'गोरिया चुरा ना मेरा जिया'वर परफॉर्म देऊन चाहत्यांची आणि तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांची मने जिंकली. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोविंदा आणि यशनं दमदार परफॉर्मन्स दिला. यावेळी गोविंदाची पत्नी सुनीताही आपल्या मुलाला आणि पतीला चिअर करताना दिसली. या कार्यक्रमात गोविंदा व्यतिरिक्त दिग्गज अभिनेता धर्मेंद्र देखील आले होते. अनेक चाहत्यांना आता बाप-लेकाची जोडी आवडत आहे. याआधी देखील गोविंदा हा वेगवेगळ्या रिअॅलिटी शोमध्ये गेला आहे. मात्र त्यानं पहिल्यांदा आपल्या मुलांबरोबर कुठल्या शोमध्ये डान्स केला आहे, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या बाप-लेकाची जोडी चर्चा होताना दिसत आहे.