महाराष्ट्र

maharashtra

'घरत गणपती' चित्रपटाची आयएमडीबीवर रेटिंग पाहिल्यानंतर व्हाल थक्क, जाणून घ्या आकडा... - Gharat Ganpati became popular

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 1:15 PM IST

Gharat Ganpati Marathi Movie : 'घरत गणपती' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर लोकप्रिय झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होत आहे.

Gharat Ganpati Marathi Movie
घरत गणपती मराठी चित्रपट (instagram - Nikita Dutta)

मुंबई - Gharat Ganpati Marathi Movie : 'घरत गणपती' मराठी चित्रपट हा प्रेक्षकांना खूप आवडत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 26 जुलै रोजी प्रदर्शित झाला. 'घरत गणपती' चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये आता देखील गर्दी होताना दिसत आहे. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अनेकजण या चित्रपटाच्या गाण्यावर रिल्स तयार करून आपल्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत भूषण प्रधान, निकिता दत्ता, अजिंक्य देव, अश्विनी भावे, संजय मोने, शुभांगी गोखले, परी तेलंग, समीर खांडेकर हे कलाकार आहेत. दरम्यान या चित्रपटाला आयएमडीबी (IMDb)वर 9.3 रेटिंग मिळाली आहे.

'घरत गणपती' चित्रपट झाला रुपेरी पडद्यालर लोकप्रिय : आता अनेक ठिकाणी 'घरत गणपती' चित्रपटाचे शोज हाऊसफूल होताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये कोकणातील गणेशोत्सव आणि परंपरा या गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये कोकणात कसा जल्लोष असतो हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'घरत गणपती'मधून अभिनेत्री निकिता दत्तानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवज्योत बंदिवाडेकर यांनी केलं आहे. कोकणातील गणेशोत्सवाची झलक आणि त्याचं महत्त्व सांगणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करेल अशी अपेक्षा आता निर्माते करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती पॅनरोमा स्टुडिओनं केली आहे.

'घरत गणपती' चित्रपटाची कहाणी :कोकणामध्ये गणेश उत्सव मोठ्या जल्लोषानं साजरा केला जाते. या विषयाला पकडून एक प्रेमकहाणी 'घरत गणपती' या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. दिल्लीत राहणारी मुलगी, जेव्हा कोकणात गणपतीसाठी येते, तेव्हा तिची गणेश उत्सवविषयीची उत्सुकता ही घरातल्यांचे मनं जिंकते. निकिता दत्ता ही या चित्रपटामध्ये क्रिती आहुजाची भूमिका साकारत आहे. क्रिती आहुजाला कोकणातल्या मराठमोळ्या केतन घरत आवडतो. यानंतर या दोघांची प्रेमकहाणी सुरू होते. या चित्रपटामध्ये केतन घरतची भूमिका ही भूषण प्रधाननं साकारली आहे.

हेही वाचा :

  1. 'डिब्बुक'नंतर निकिता दत्ता 'घरत गणपती'मधून करणार मराठी पदार्पण

ABOUT THE AUTHOR

...view details