मुंबई :अभिनेता राम चरमच्या 'गेम चेंजर'नं पहिल्या दिवशी भारतात 51 कोटींची दमदार ओपनिंग केली. या चित्रपटानं आतापर्यंत जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकला नाही. जबरदस्त ओपनिंगनंतर, राम चरणच्या राजकीय ड्रामा रिलीजच्या दुसऱ्या दिवशी देशांतर्गत कलेक्शनमध्ये 100 कोटींचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा होती, मात्र इथे परिस्थिती पूर्णपणे वेगळी झाली आहे. 'गेम चेंजर'च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'गेम चेंजर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2 : दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर राम चरण स्टारर 'गेम चेंजर'नं रिलीजच्या दुसऱ्या 21.5 कोटींची कमाई केली. यासह, चित्रपटाचं दोन दिवसांचे कलेक्शन 72.5 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. 'गेम चेंजर'नं तेलुगूमध्ये 12.7 कोटी, तमिळमध्ये 2.12 कोटी आणि हिंदीमध्ये 7.5 कोटींची कमाई केली. 'गेम चेंजर'च्या निर्मात्यांनी अलीकडेच एका पोस्टरद्वारे खुलासा केला की, या चित्रपटानं जगभरात 186 कोटींची ओपनिंग केली आहे. दरम्यान यासह 'गेम चेंजर' हा जगभरात 100 कोटी रुपये ओलांडणारा वर्षातील पहिला चित्रपट बनला आहे. आता 'गेम चेंजर' चित्रपट येणाऱ्या दिवसांमध्ये किती कमाई करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.
'गेम चेंजर'ची कमाई
पहिला दिवस - 51 कोटी रुपये