मुंबई - Gaami teaser OUT :साऊथ चित्रपटसृष्टीमधील चित्रपटांचा सध्या खूप क्रेझ सुरू आहे. अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार साऊथ चित्रपटसृष्टीत काम करताना दिसत आहेत. दरम्यान आगामी तेलुगू चित्रपट 'गामी' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विद्याधर कागीता यांनी केलंय. याशिवाय 'गामी'चे निर्माते कार्तिक सबरीश हे आहेत. आज 17 फेब्रुवारी रोजी 'गामी' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टीझरबरोबर चित्रपटातील सर्व पात्रांचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. 'गामी' हा एक तेलुगू चित्रपट आहे, जो जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
'गामी'ची स्टार कास्ट : 'गामी' या चित्रपटात विश्वेक सेन एका अघोराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटावर गेल्या चार वर्षांपासून काम सुरू आहे. 'गामी' चित्रपटात विश्वेक सेन व्यतिरिक्त चांदनी चौधरी , एमजी अभिनय, मोहम्मद समद, दयानंद रेड्डी आणि हरिका पिडाडा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट रहस्यमयी आणि थरारक असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा 29 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. 'गामी' हा रुपेरी पडद्यावर 8 मार्चला जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला संगीत नरेश कुमारन यांनी दिलंय. कार्तिक कुल क्रिएशन्स व्ही सेल्युलॉइड निर्मित 'गामी'चा रनटाईम 148 मिनिटांचा आहे.