मुंबई - Katrina Kaif Birthday : अभिनेत्री कतरिना कैफ अनेक बॉलिवूड चित्रपटात तिच्या अभिनयानं आणि नृत्याच्या उत्तम स्टाईलमुळं नेहमी झळकत राहिली आहे. तिची काही गाणी एक अभिनेत्री आणि कलाकार म्हणून तिच्या कौशल्याचे आणि दर्जाचे विविध पैलू दाखवतात. 'शीला की जवानी' पासून ते 'काला चष्मा' असो किंवा 'चिकनी चमेली' ते 'स्वॅग से स्वागत' पर्यंत कतरिनानं तिच्या कारकिर्दीत काही अप्रतिम गाणी सादर केली आहेत. वेगळ्या आणि नजरेत भरणाऱ्या हुक स्टेप्सनी तिन प्रेक्षकांना आपल्या नृत्यात गुंग करुन टाकलंय. तिनं सादर केलेल्या अनेक गाण्यांनी गेल्या काही वर्षात पार्ट्या, लग्नं आणि इतर कार्यक्रमात स्थान आणि लोकप्रियता मिळवली आहे.
आज तिच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त, आपण या कतरिना कैफच्या करिअरची व्याख्या करणारी काही गाणी पाहू या...
1. शीला की जवानी ( तीस मार खान 2010): हे गाणे त्याच्या आकर्षक बीट्स आणि कॅटरिनाच्या एनर्जटिक डान्स स्टेप्ससाठी आजही पार्टी अँथममध्ये अव्वल स्थानावर आहे. या गाण्यातनं तिनं आपली जबरदस्त उर्जेचं प्रदर्शन केलं होतं. तीस मार खान चित्रपटातील शीला की जवानी या गाण्यावर आजवर लाखो लोकांनी नृत्य केलंय.
2. चिकनी चमेली ( अग्निपथ 2012): एक शक्तिशाली आयटम डान्स असलेल्या या गाण्यावर कतरिनानं आपला करिष्मा दाखवून लोकप्रियता मिळवली. एक उत्तम नर्तिका म्हणून तिनं या गाण्यातून अष्टपैलुत्व दाखवून दिलं. तिच्या आत्मविश्वासपूर्ण नृत्यानं गाण्यातील भावना प्रेक्षकांच्या काळजापर्यंत थेट पोहोचल्या.
3. काला चष्मा ( बार बार देखो 2016): या गाण्यातील कतरिनाच्या दमदार डान्सने तिच्या नृत्यातील चपळता, बेभानता, आनंदाचे सूर आणि तिची नृत्य दिनचर्या यांचे उत्कृष्ट मिश्रण सादर केले. या गाण्यात बॉस्को मार्टिसच्या नृत्यदिग्दर्शनासह कतरिना आणि सिद्धार्थ मल्होत्रा होते. तिच्यातील उर्जा आणि आत्मविश्वासासह तिच्या उत्कृष्ट नृत्याच्या हालचालींनी प्रेक्षकांना मोहित केले.
4. अफगाण जलेबी (फँटम 2015): कतरिनाने या गाण्यातील नृत्यातून अफगाण संस्कृतीचे सार आत्मसात करून, नृत्यशैली आणि वांशिक थीमशी जुळवून घेण्याची तिची क्षमता दाखवून दिली आणि तिच्या बहुमुखी प्रतिभेचं दर्शन घडवलं.