मुंबई - सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार असला तरी त्यानं उत्तम होस्ट असल्याचं अनेक इव्हेन्ट्समधून सिद्ध केलंय. भारतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसचा अजिंक्य होस्ट म्हणूनही त्यानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. चौथ्या सीझनपासून या शोचं सूत्रसंचालन करणाऱ्या सलमानन त्याच्या करिष्माई उपस्थितीसह, हजरजबाबीपणा, उत्स्फुर्त विनोद आणि आकर्षक स्टाईलनं या शोला ताजे तजलदार ठेवलंय. केवळ प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडचे मोठे स्टार देखील सलमानला शोचा सर्वोत्तम होस्ट मानतात आणि म्हणतात की त्याची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. बॉलिवूड स्टार्सनी सलमान खानची बिग बॉसचा सर्वोत्तम आणि अजिंक्य होस्ट म्हणून प्रशंसा केली अशा काही संस्मरणीय क्षणांवर एक नजर टाकूयात.
शाहरुख खान केलं 'अद्भुत' होस्टचं कौतुक- बिग बॉस सीझन १२ च्या 'वीकेंड का वार' या खास भागामध्ये जेव्हा शाहरुख खान आला होता तेव्हा त्यानं सलमानच्या होस्टिंग कौशल्याचं कौतुक केलं होतं.'अप्रतिम होस्ट' म्हणत किंग खाननं त्याचं गुणगान केलं होतं. सलमानच्या उत्स्फूर्ततेचे आणि प्रेक्षकांशी जोडण्याच्या क्षमतेचंही त्यानं कौतुक केलं आणि सांगितलं की सलमानसारखं कोणीही होस्ट करू शकत नाही.
अनिल कपूरनं केला सलमानच्या वारशाला सलाम - बिग बॉस ओटीटी ३ चे सूत्रसंचालन करणारे अनिल कपूर यांनीही सलमानच्या शोमधील योगदानाचं कौतुक केलं होतं. अनिलनं कबूल केलं की, सलमानचा करिष्मा आणि त्याची सूत्रसंचालन स्टाईलची दुसऱ्या कुणाशीही तुलनाच होऊ शकत नाही. अनिलच्या या कबुलीमुळे बिग बॉसमधील सलमानचा मजबूत वारसा आणखी अधोरेखित होऊन जातो.