महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

5 महिन्यांत जिममध्ये घाम गाळून 26 किलोपेक्षा कमी वजन केल्यानंतर जयदीप अहलावत केलं चाहत्यांना प्रभावित - JAIDEEP AHLAWAT - JAIDEEP AHLAWAT

Jaideep Ahlawat : जयदीप अहलावत सध्या 'महाराज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी त्यानं खूप मेहनत केली आहे. त्यानं 'महाराज'साठी 109.7 किलो वजन वाढवलं होत. यानंतर जयदीपनं 5 महिन्यांत जिममध्ये घाम गाळून 26 किलोपेक्षा कमी वजन केलं.

jaideep ahlawat
जयदीप अहलावत (jaideep ahlawat - instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 1:01 PM IST

मुंबई - Jaideep Ahlawat :बॉलिवूडचा दमदार अभिनेता जयदीप अहलावत सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खाननं 'महाराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलय. हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. जयदीप अहलावत या चित्रपटात धार्मिक भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेत येण्यासाठी जयदीपनं शारीरिक परिवर्तनही केलं होत. जयदीपनं स्वतः सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना शारीरिक परिवर्तनाची झलक शेअर केली आहे. त्यानं 5 महिने जिममध्ये घाम गाळून 26 किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं होतं.

26 किलो वजन कमी केलं :त्यानं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्याचं पोट बाहेर आलेले आहे. याशिवाय दुसऱ्या फोटोत त्याचं सिक्स पॅक ॲब्स दिसत आहेत. आता जयदीप अहलावतच्या शारीरिक परिवर्तनावर भरपूर लाईक्स येत आहेत. 'महाराज' या चित्रपटात पुजाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी जयदीपनं खूप मेहनत घेतली. त्यानं त्याच्या शरीराचे वजन 109.7 किलो केले आणि वर्कआउट केल्यानंतर ते 83 किलो झाले होते. त्यानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "पाच महिन्यांत 109.7 किलोवरून 83 किलो. महाराजांच्या भूमिकेसाठी हे शारीरिक परिवर्तन आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद प्रज्वल सर."

जयदीपचं केलं चाहत्यांनी कौतुक : प्रज्वल शेट्टीनं देखील आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात जयदेव डंबेल उचलताना दिसत आहे. आता जयदीपच्या या मेहनतीवर त्याच्या चाहत्यांच्या आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, "तुम्हाला सलाम." दुसरा चाहता लिहिलं, "खूप चांगला अभिनय केला 'महाराज' चित्रपटात'. आणखी एक युजर लिहिलं, "आता लीड ॲक्टरपेक्षा खलनायकासाठी हे जास्त लोक पसंत करतात." दरम्यान या पोस्टवर अभिनेत्री रिचा चढ्ढा लिहिलं, "खूप सुंदर" अभिनेता बख्तियार इराणीनं लिहिलं, "जिथे आपण सुरुवात केली होती, तिथे फक्त कॉन्टॅक्ट लेन्स आणि चष्म्याचा अभाव आहे." जयदीपनं 'जाने जान', 'पाताल लोक', 'ब्लडी ब्रदर्स', 'द ब्रोकन न्यूज', 'बार्ड ऑफ ब्लड' यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान लंडनमध्ये कुटुंबासह खेळला क्रिकेट, फोटो व्हायरल - shah rukh khan
  2. अभिनेता जितेंद्रच्या ड्रेस डिझाईनरचा चोरीला गेलेला मोबाईल सापडेल का? - A stolen mobile phone
  3. मलायका अरोरानं खास मैत्रीण करिश्मा कपूरला पाठवल्या 'पन्नाशी'च्या शुभेच्छा - Karisma Kapoor birthday

ABOUT THE AUTHOR

...view details