महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रोहित शेट्टी 'सिंघम', 'सूर्यवंशी' आणि 'सिम्बा'नंतर 'लेडी सिंघम' कॉप युनिव्हर्समध्ये येण्यासाठी सज्ज, दीपिका पदुकोण असेल पहिली पसंत - LADY SINGHAM CHARACTER

'सिंघम अगेन'चा दिग्दर्शक रोहित शेट्टी दीपिका पदुकोणचं पात्र 'लेडी सिंघम'साठी कॉप युनिव्हर्समध्ये चित्रपट बनवण्याच्या तयारीत असल्याचा दिसत आहे.

rohit shetty
रोहित शेट्टी (रोहित शेट्टी-दीपिका पदुकोण (Movie poster / IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 12, 2024, 2:25 PM IST

Updated : Nov 12, 2024, 2:34 PM IST

मुंबई -रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा नुकताच रिलीज झालेला 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अजय देवगण स्टारर चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे. या चित्रपटात अजयशिवाय रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, करीना कपूर यांसारखे कलाकार आहेत. सिंघम फ्रँचायझीमध्ये अजय आणि करीना दोघेही दिसले आहेत. अक्षय कुमार कॉप युनिव्हर्सच्या 'सूर्यवंशी'मध्ये तर रणवीर सिंग 'सिम्बा'मध्ये दिसले आहेत. मात्र दीपिका पदुकोण आणि टायगर या फ्रँचायझीमध्ये नवीन आहेत. त्यामुळे दीपिका आणि टायगरच्या पात्रांवर रोहित वेगळा चित्रपट करणार अशी चर्चा सुरू आहे.

'सिंघम अगेन'मध्ये दीपिका 'लेडी सिंघम' :रोहितच्या कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसली आहे. या चित्रपटात ती लेडी सिंघम अवतारात आहे. आता, दिग्दर्शक रोहित शेट्टी दीपिकाचं पात्र 'लेडी सिंघम'साठी कॉप युनिव्हर्समध्ये चित्रपट बनवेल, अशा चर्चा होत आहेत. (शक्ती शेट्टी) दीपिकाच्या पात्राबद्दल रोहित म्हटलं, "मला माहित आहे की हे पात्र कसे असेल आणि त्याची मूळ कथा काय असेल. पण दिग्दर्शक आणि लेखक म्हणून त्यांचा संपूर्ण प्रवास मला अजून माहीत नाही. याशिवाय रोहित शेट्टीनं आपल्या सिनेमॅटिक विश्वात एका लेडी कॉपची ओळख करून देण्यासाठी इतका वेळ का घेतला याबद्दल देखील सांगितलं. या पात्रासाठी योग्य स्क्रिप्टची वाट पाहत असल्याचं रोहितनं यावेळी सांगितलं.

रोहित शेट्टीनं केलं विधान :अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात महिला पोलिसाची ओळख करून देण्याची कल्पना त्याच्या मनात आली होती. दीपिका पदुकोणबरोबरच्या स्वतंत्र चित्रपटाबद्दल बोलताना रोहित म्हटलं की, "यावर अजून काही लिहिलेलं नाही. आमच्या मनात एक कल्पना आहे, जी अंमलात आणण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. 'सिंघम अगेन' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 1 नोव्हेंबरला दाखल झाला आहे. या चित्रपटानं जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला असून देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'सिंघम अगेन' हा कार्तिकच्या 'भूल भुलैया 3'बरोबर बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करत आहे.

हेही वाचा :

  1. 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3'नं केला बॉक्स ऑफिसवर धमाका, कमाईचे आकडे आले समोर...
  2. 'सिंघम अगेन'नंतर लगेचच अजय देवगण आणि रोहित शेट्टी सुरू करणार 'गोलमाल 5' ची तयारी
  3. 'भूल भुलैया 3' ठरला सर्वात वेगवान 150 कोटींची कमाई करणारा चित्रपट, 'सिंघम अगेन' 200 कोटींच्या उंबरठ्यावर
Last Updated : Nov 12, 2024, 2:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details