मुंबई Kumar Shahani passes away :हिंदी चित्रपटसृष्टीत एक दुःखद बातमी समोर येत आहे. दिग्दर्शक कुमार शहानी यांचे निधन झालं आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. वयाच्या ८३ व्या वर्षी कुमार शहानी यांनी हे जग सोडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहानी हे बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. कुमार शहानी यांनी 'माया दर्पण', 'कसबा', 'तरंग' आणि 'ख्याल गाथा' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलंय. दिग्दर्शक असण्यासोबत कुमार यांनी लेखक आणि शिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला. कुमार शहानी यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर सेलेब्स सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त करत आहेत.
नील माधव पांडानं केला शोक व्यक्त : 'आय ॲम कलाम' सारख्या अनेक चित्रपटांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले निर्माता-दिग्दर्शक नील माधव पांडा यांनी कुमार शहानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिल,'सिनेमॅटिक प्रभुत्वाने जीवनाचा कॅनव्हास रंगवणारे दूरदर्शी चित्रपट निर्माते कुमार शहानी यांचे निधन झाले आहे. सिनेसृष्टीतील एका दिग्गजानं जगाचा निरोप घेतला. तुमची कला सदैव प्रेरणा देत राहील.''