मुंबई :16 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत 60व्या फेमिना मिस इंडियाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 30 राज्यांतील सुंदरी स्पर्धा करतील. तसेच यात केंद्रशासित प्रदेशातील सुंदरींचाही समावेश आहे. फेमिना मिस इंडिया 2024ची विजेती मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. फेमिना मिस इंडिया खिताब जिंकल्यानंतर नाव-प्रसिद्धीच नाही तर भारताच्या मनोरंजन आणि ग्लॅमर राजधानी मुंबईत राहण्याची संधी देखील मिळते. 60व्या वर्धापन दिनाचे स्मरण आणि उत्सव साजरा करण्यासाठी, मिस इंडिया ऑर्गनायझेशननं 'राईज ऑफ क्वीन' नावाचा एक ऑडिओ ट्रॅक लॉन्च केला होता, जो जगभरातील सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
मिस इंडिया 2024 ग्रँड फिनालेचा मुकुट कोणाला मिळणार?, मुंबईत होईल निर्णय... - FEMINA MISS INDIA
60वी फेमिना मिस इंडिया 2024 स्पर्धा 16 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित केली जाणार आहे. यामध्ये 30 राज्यांतील सुंदरी भाग घेणार आहेत.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Oct 16, 2024, 8:06 PM IST
'या' भारतीय सुंदरी मिस वर्ल्ड झाल्या आहेत : आतापर्यंत 6 सुंदरींनी मिस वर्ल्ड स्पर्धेत विजेतेपद पटकावून देशाचं नाव उंचावलं आहे. यात 1966मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी रीता फारिया पहिली मिस इंडिया ठरली. एका वर्षानंतर, तिनं मॉडेलिंग आणि चित्रपट करणं सोडलं. त्याऐवजी तिनं वैद्यकीय अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. रिता फारिया ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सची विद्यार्थी होती. यानंतर ऐश्वर्या राय 1994 मध्ये हा किताब जिंकणारी दुसरी भारतीय ठरली. 1994 मध्ये ऐश्वर्या राय विजेती आणि सुष्मिता उपविजेती या स्पर्धेत होत्या. त्याच वर्षी ऐश्वर्याला मिस वर्ल्ड आणि सुष्मिताला मिस युनिव्हर्सचा ताज मिळाला.
मिस वर्ल्डस्पर्धेत प्रतिनिधित्व करेल: यानंतर डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999), प्रियांका चोप्रा (2000) आणि मानुषी छिल्लर (2017) यांनी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर जगात भारताचे नाव झाले. आता देश आपल्या राष्ट्राचा वारसा पुढं नेणाऱ्या नवीन स्पर्धकांची वाट पाहत आहे. 16 ऑक्टोबर 2024 रोजी 30 स्पर्धकांनामध्ये टक्कर होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी राजस्थानची सध्याची मिस इंडिया नंदिनी गुप्ता तिच्या उत्तराधिकारी म्हणून जिंकणाऱ्या स्पर्धकाला मुकुट घालेल. यानंतर हीच स्पर्धक विजेता, मिस वर्ल्ड स्पर्धेच्या 73व्या आवृत्तीत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. आता ही स्पर्धा कोण जिंकेल यासाठी अनेकजण आतुर आहेत.