महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'फादर्स डे'निमित्त सर्वोत्तम पाच हृदयस्पर्शी चित्रपट वडिलांबरोबर पाहा - FATHERS DAY 2024 - FATHERS DAY 2024

Father's Day 2024: आज 16 जून रोजी 'फादर्स डे' साजरा केला जात आहे. हा दिवस खूप खास आहे, आज तुम्ही वडिलांना समर्पित असलेले चित्रपट पाहू शकता.

Fathers Day 2024
फादर्स डे (Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 3:51 PM IST

मुंबई - Father's Day 2024: 'फादर्स डे' आज म्हणजेच 16 जून रोजी साजरा केला जात आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी, तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर काही सर्वोत्तम बॉलिवूड चित्रपट पाहून हा दिवस साजरा करू शकता. आज आम्ही या विशेष प्रसंगी 5 सर्वोत्तम चित्रपट घेऊन आलो आहोत. आजचा दिवस हा प्रत्येक वडिलांसाठी आणि मुलांसाठी विशेष आहे.

'अंग्रेजी मीडियम' : 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात इरफान खान आणि राधिका मदान यांनी वडील आणि मुलीची सुंदर भूमिका साकारली होती. या चित्रपटात करीना कपूरचीही महत्त्वाची भूमिका होती. 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाची कहाणी एका वडिलांची आहे, जो आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. या चित्रपटाची कहाणी मनाला भिडणारी आहे.

'दृश्यम ': निशिकांत कामत दिग्दर्शित आणि अजय देवगण स्टारर 'दृश्यम' हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. एक पिता आपल्या कुटुंबाला कोणत्याही संकटातून वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, ते या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'छिछोरे' : 2019 रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट 'छिछोरे'मध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या भूमिकेत दाखविला गेला होता. यानंतर त्याला एका जबाबदार वडिलांमध्ये गंभीर रुपात दाखविण्यात आलं. त्याचा मुलगा राघव (मोहम्मद समद) अयशस्वी होण्याच्या भीतीनं आत्महत्येचा प्रयत्न करतो. या क्षणी सुशांतचं पात्र राघवचं मार्गदर्शक बनतो. या चित्रपटाची कहाणी खूप सुंदर आहे. 'छिछोरे' चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलंय.

'पिकू' :शूजित सिरकार दिग्दर्शित हा चित्रपट 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती एनपी सिंग, रॉनी लाहिरी आणि स्नेहा रजनी यांनी केली आहे. 'पिकू'ची कहाणी, कॅब कंपनीचा मालक राणा (इरफान खान) भास्कर (अमिताभ बच्चन) आणि त्याची मुलगी पिकू (दीपिका पदुकोण) बरोबर रोड ट्रिपला जातो. या चित्रपटात वृद्ध आई-वडील आणि त्यांची प्रौढ मुले यांच्या आधुनिक युगातील नातेसंबंधांचे सुंदर चित्रण करण्यात आलं आहे.

'दंगल ':आमिर खान स्टारर 'दंगल' हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची कहाणी माजी राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांनी त्याच्या मुलींना कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन कसं दिलं हे या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सुहानी भटनागर, सान्या मल्होत्रा , झायरा वसीम, साक्षी तंवर आणि विवान भटेना हे कलाकार आहेत. 'दंगल' चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. अंकिता लोखंडे आणि तिची सासू रंजना जैनचा मंदिरातील व्हिडिओ व्हायरल, यूजर्सनं केलं ट्रोल - Anikita Lokhande News
  2. दिलजीत दोसांझनं प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'मध्ये गायलं गाणं, प्रोमो रिलीज - Kalki 2898 AD First Song Promo out
  3. हनी सिंगनं बेस्ट फ्रेंड सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं दिलं आश्वासन - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING

ABOUT THE AUTHOR

...view details