मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन मोठे चित्रपट, 'गेम चेंजर' आणि 'फतेह' उद्या म्हणजेच 10 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही चित्रपटामध्ये वाईटावर चांगल्याचा विजय दाखविण्यात आला आहे. 'गेम चेंजर' हा एक राजकीय अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. दुसरीकडे ' फतेह' हा एक अॅक्शन क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अॅक्शनबरोबर रणबीर कपूर स्टारर चित्रपट 'अॅनिमल' आणि साऊथ चित्रपट 'मार्को' सारखी हिंसाचार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. 'गेम चेंजर' हा मोठ्या बजेटचा चित्रपट आहे. तसेच सोनू सूदचा चित्रपट हा कमी बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.
'फतेह' चित्रपटातं तिकिट स्वस्त :'फतेह' बॉक्स ऑफिसवर 'गेम चेंजर'चा खेळ खराब करू शकतो, असं सध्या म्हटलं जात आहे. 'गेम चेंजर' अंदाज 400 ते 450 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आहे. हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर सोनू सूद स्टारर 'फतेह' चित्रपटाशी टक्कर देईल. सोनू सूदनं 'फतेह' चित्रपट देशाला समर्पित केला आहे. या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे तिकिट 99 रुपये किंमतची आहे. 'फतेह' पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी जमू शकते. 'गेम चेंजर'नं भारतात आगाऊ बुकिंग करून 5,13,235 तिकिटे विकून 27 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच आगाऊ बुकिंग करण्याऐवजी, 'फतेह'नं चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 99 रुपये करून प्रेक्षकांना एक भेट दिली आहे. 'गेम चेंजर'चा हिंदी पट्ट्याच्या कमाईवर मोठा परिणाम होईल असं सध्याचं चित्र दिसत आहे.