महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रणवीर सिंगच्या 'डॉन 3' बद्दल फरहान अख्तरची मोठी अपडेट - रणवीर सिंग

Ranveer Singhs Don 3 : रणवीर सिंगची भूमिका असलेल्या 'डॉन' चित्रपटाबद्दलचे अपडेट काही वेळातच समोर येईल. 1978 मध्ये आलेल्या अमिताभ स्टारर 'डॉन'नंतर 2006 मध्ये शाहरुखला घेऊन याचा रिमेक फरहान अख्तरने बनवला होता. त्याचाही एक सीक्वेल हिट झाला. आता 'डॉन' फ्रँचाइजीचा नवा चित्रपट घेऊन फरहान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Ranveer Singh's 'Don 3'
रणवीर सिंग स्टारर डॉन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 9:53 AM IST

मुंबई - Ranveer Singhs Don 3 : रणवीर सिंग अभिनीत आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर 'डॉन 3' चित्रपटाची प्रतीक्षा चाहते खूप काळापासून करत आहेत. मध्यंतरी या चित्रपटाची घोषणा करणारा टीझर फरहान अख्तरने लॉन्च करुन मनोरंजन जगतात हवा निर्माण केली होती. या गोष्टीलाही आता सहा महिने उलटले आहेत. आता या चित्रपटाबद्दलची उत्कंठा ताणली असताना फरहानने नवीन अपडेट जारी करणार असल्याचं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन चाहत्यांना वचन दिले आहे. त्यानुसार आज कोणत्याही क्षणी याबद्दलची नवी माहिती आपल्या समोर येऊ शकते. सोमवारी रात्री इंस्टाग्राम स्टोरीवर दिग्दर्शक फरहान अख्तरने 'डॉन 3' चे पोस्टर शेअर केले आणि लिहिले आहे, "उद्या विशेष घोषणा."

रणवीर सिंग स्टारर डॉन

याआधी ऑगस्ट २०२३ मध्ये फरहानने एका खास घोषणा करणाऱ्या व्हिडिओसह हिट फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटात रणवीर सिंग नवीन 'डॉन' असल्याचे उघड केले होते. त्यामुळे रणवीर सिंगच्या तमाम चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता. टीझरमध्ये रणवीर एका बिल्डिंगमध्ये कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेला दिसत आहे. तो सिगारेट शिलगावतो, डॉन म्हणून स्वत:ची ओळख करून देतो आणि मग कॅमेऱ्याकडे वळतो. यातील रणवीरचा हा डॅपर डॉन लूक प्रेक्षकांच्या पसंतील उतरला होता. यामध्ये त्याने लेदर जॅकेट आणि मॅचिंग पँटसह लेदर बूट्स आणि मॅचिंग सनग्लासेससह ऍक्सेसरीझ केले होते.

'डॉन'ची भूमिका आधीच्या चित्रपटात शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. अमिताभने 1978 मध्ये साकारलेला 'डॉन' लोकांच्या कायम स्मरणात राहिला. त्यानंतर फरहान अख्तरने 'डॉन'चे हक्क स्वतःकडे घेतले आणि शाहरुख खानसह 2006 मध्ये 'डॉन' हा चित्रपट बनवला. यालाही लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर या चित्रपटाचा सीक्वेल 2011 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला न्यूचेटेल इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.

फरहान अख्तर

'डॉन' या चित्रपटाचा फ्रँचाईजी बनवण्याचा फरहान अख्तर आणि त्याच्या बॅनरचा विचार आहे. त्यानुसार नव्या डॉनच्या रुपात रणवीर सिंग झळकणार आहे. 2025 मध्ये 'डॉन'चे नवे पर्व सुरू होईल. या चित्रपटाबद्दलचे नवीन अपडेट आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात देत आहोत.

ABOUT THE AUTHOR

...view details