मुंबई- Fardeen Khan : अभिनेता फरदीन खाननं अलीकडेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबरचा भेटीचा जुना किस्सा सांगितला. 24 वर्षापूर्वी त्यानं काम मिळावं यासाठी संजय लीला भन्साळी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी भन्साळी यांनी त्याला नकार दिला होता. त्याच्या डोळ्यात आवश्यक उत्कटता किंवा आग जाणवत नसल्याबद्दल भन्साळींच्या मनात एक प्रकारची त्याच्या विषयीची अढी असल्याचं त्याला जाणवलं होतं.
अलीकडे झालेल्या एका प्रमोशनल मुलाखतीमध्ये फरदीननं हा खुलासा केला. तो दहा वर्षाच्या दीर्घ विश्रांतीनंतर भन्साळी यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बझार'मध्ये अभिनेता म्हणून रुजू झाला आहे. तो म्हणाला, "हीरामंडीचं स्क्रिप्ट ऐकण्यासाठी मी संजय लीला भन्साळी यांना भेटीसाठी गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना यापूर्वी भेटीस आलो होतो त्याचा किस्सा सांगितला. 2000 मध्ये मी त्यांच्याकडे काम मागण्यासाठी गेलो होतो. ते मला भेटले, आम्ही एकत्र बसलो आणि 10-15 मिनिटं बोललो. ते मला म्हणाले, "हे बघ फरदीन मला वाटत नाही की आपण एकत्र काम करू शकू, कारण मला तुझ्या डोळ्यात ती आग दिसत नाही."
सुरुवातीलाच हा मोठा धक्का बसलेला असतानाही फरदीनला भन्साळी यांनी दिलेल्या त्या प्रामाणिक अभिप्रायाचा प्रभाव मान्य केला आणि हेही कबूल केलं की त्यावेळी त्यावेळी त्याच्यासाठी खूप कठोर वाटलं होतं, परंतु ते ऐकणंही आवश्यक होतं. "त्या वेळी अर्थातच ते मला खूप क्रूर वाटलं होतं आणि मी यावेळी त्यांना सांगितलं की कधीकाळी जरी ते क्रूर वाटत असलं तरी, ते काय म्हणाले हे मला ऐकणं भाग होतं किंबहुना ते मला ऐकणं अत्यावश्यक होतं," असं फरदीननं सांगितलं.
फरदीन खाननं संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितलं, "यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की मला ते 'ब्लॅक' चित्रपटात कास्ट करणार होते. मी ते पहिल्यांदाच ऐकलं. परंतु त्यांच्यासारख्या एका उत्तम चित्रकर्मीकडे काम करण्याची संधी मला मिळेल, हे मला वाटलं नव्हतं. याबद्दल मी कायम कृतज्ञ असेन. तो एक शिकण्याचा सुंदर अनुभव होता. त्यामुळे मला एक वेगळ्या पातळीवर पोहोचवलं."