मुंबई - Farah Khan mother passed away : कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खान आणि बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान यांच्या आई मेनका इराणी यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून त्या एका दुर्धर आजाराशी झुंज देत होत्या. सुप्रसिद्ध कलाकार डेझी इराणी आणि हनी इराणी यांच्या बहिण असलेल्या मेनका यांनीही काही काळ अभिनय केला होता. 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बचपन’ या चित्रपटात त्या बहिण डेझीबरोबर दिसल्या होत्या
मेनका इराणी यांच्या निधनाची बातमी त्यांच्या काही दिवसापूर्वी झालेल्या वाढदिवसानंतर आली आहे. त्यांचा 12 जुलै वाढदिवस होता आणि लेक फराह खाननं तिच्या आईच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक मनापासून पोस्ट शेअर केली होती. या फोटोमध्ये फराहनं तिच्या आईचा हात धरला होता आणि कॅमेऱ्याला छान पोज दिली होती.
आईच्या वाढदिवसाला एक भावनिक संदेश देताना फराहनं लिहिलं होतं की,“आपण सर्वजण आपल्या आईला गृहीत धरतो... मी माझी आई मेनकावर किती प्रेम करतो याचा खुलासा हा गेल्या महिन्यात झाला आहे. मी पाहिलेली ती सर्वात बलवान, धाडसी व्यक्ती आहे, अनेक शस्त्रक्रियांनंतरही तिची विनोदबुद्धी कायम आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! घरी परतण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करण्यासाठी तू इतकं मजबूत होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
फराह खानचा भाऊ साजिद खाननंही आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यामध्ये साजिद आणि फराह आपल्या आईबरोबर दिसले होते. फराह खान आणि साजिद खान यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यांची आईही या जगात नाही. फराह 59 वर्षांची असून साजिद 53 वयाचा आहे. फराहचं लग्न शिरीष कुंदर यांच्या बोरबर झालं असून त्यांना तीन मुलं आहेत. साजिद अद्याप अविवाहित आहे.
फराह आणि साजिदच्या या पोस्टनंतर अनेकांनी मेनका इराणी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या आणि दीर्घायुष्यही चिंतलं होतं. मात्र आज आलेल्या या दुःखद बातमीमुळं बॉलिवूडमधील कालाकारांना शोक व्यक्त करण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही.