मुंबई - Pushpa 2 Teaser in Devara :अभिनेता ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1' या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक अखेर 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रेक्षक या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहत होते. 'देवरा पार्ट 1' चित्रपटाला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खचाखच गर्दी आहे. दरम्यान अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'चा टीझर निर्मात्यांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांना दाखवून एक सरप्राईज दिलंय. हा चित्रपट पाहात असताना प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळाला आहे. 'पुष्पा 2'चा टीझर पाहून संपूर्ण चित्रपटगृह टाळ्यांच्या कडकडाटात झाला आणि प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाट उसळली.
'पुष्पा 2'चा टीझर पाहून प्रेक्षक वेडे : 'देवरा पार्ट 1'च्या निर्मात्यांनी स्क्रिनिंगदरम्यान 'पुष्पा 2'चा टीझर दाखवून प्रेक्षकांना खुश केलं आहे. एका चित्रपटगृहामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 'पुष्पा 2'चा टीझर हा पडद्यावर दिसत आहे. हा टीझर पाहून अनेकजण यावेळी नाचले. आता प्रेक्षक 'पुष्पा 2' चित्रपटाच्या रिलीजची वाट आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि फहद फासिल हे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे.