महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ईशा देओल आणि भरत तख्तानी लग्नाच्या १२ वर्षांनंतर झाले वेगळे - Esha Deol Separated

Esha Deol and Bharat Takhtani : अभिनेत्री ईशा देओल लग्नाच्या 12 वर्षांनंतर पती भरत तख्तानीपासून वेगळी होत आहे. या दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

Esha Deol and Bharat Takhtani
ईशा देओल आणि भरत तख्तानी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 10:51 AM IST

मुंबई Esha Deol and Bharat Takhtani :दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा महिली यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओलनं 12 वर्षांपूर्वी बिझनेसमन भरत तख्तानीबरोबर लग्न केलं होतं. या दोघांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले होते. दरम्यान काही दिवसापूर्वी या कपलमध्ये काही ठीक नसल्याचं समोर आलं. आता सोशल मीडियावर ईशानं तिच्या पतीबरोबर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये या जोडप्यानं त्यांच्यात पूर्वीसारखे काही राहिले नसल्याचं सांगितलं आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी लग्नाच्या 12 वर्षानंतर वेगळे होत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

ईशा आणि भरतनं पोस्ट केली शेअर :संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ''आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील या बदलामुळे आमच्या दोन मुलांचे हित आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल, अशी आम्ही अपेक्षा करतो.'' ईशानं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला होता. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं होत की, ''अनंतकाळ एकत्र ठेवा.'' याशिवाय हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघेही शेवटचे एकत्र दिसले होते. 2023 मध्ये ईशा देओलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये भरत गायब होता.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल : एका सोशल मीडिया यूजरनं 17 जानेवारीला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होत की, ईशा आणि भरत आधीच एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे ते आता सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नाहीत. एवढेच नाही तर या पोस्टमध्ये या युजरनं असा दावाही केला आहे की, भरत त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. याशिवाय भरतला बंगळुरूमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एका पार्टीत एका मैत्रिणीबरोबर असल्याचं देखील त्यानं सांगितलं होतं. यानंतर देओल कुटुंबातील कोणीही या व्हायरल वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही. ईशानं जून 2012 मध्ये भरतशी लग्न केलं होतं. मुंबईच्या इस्कॉन मंदिरात हा विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला होता. लग्नाच्या पाच वर्षानंतर, हे जोडपे एका मुलीचे ( राध्या) आई-वडील झाले. यानंतर ईशानं 2019 मध्ये दुसऱ्या मुलीला (मिराया) जन्म दिला.

हेही वाचा :

  1. 'हनुमान' चित्रपटानं 25 दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवरओलांडला 300 कोटींचा टप्पा
  2. 'स्वर माऊली' लता मंगेशकरांनी अमर केले संतांचे अभंग
  3. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा बेल्जियममध्ये शॉपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details