महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Emraan Hashmi : सारा अली खान स्टारर 'ऐ वतन मेरे वतन' मधील इमरान हाश्मीचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - Emraan hashmi

Emraan Hashmi first Look Poster out : सारा अली खान अभिनीत 'ऐ वतन मेरे वतन'मधील इमरान हाश्मीचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये तो स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे.

Emraan Hashmi first Look Poster out
इमरान हाश्मीचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 4:48 PM IST

मुंबई - Emraan Hashmi first Look Poster out :स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओनं आज 11 मार्च रोजी सारा अली खान अभिनीत चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन' मधील इमरान हाश्मीचं फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केलं आहे. या चित्रपटामध्ये इमरान स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी चित्रपटामधील पहिलं गाणं 'कतरा कतरा' हे प्रदर्शित करण्यात आलं होतं. 'कतरा कतरा' गाण्याचा ट्रॅक पहिल्यांदा 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) प्रदर्शित करण्यात आला होता. या गाण्यावर सुखविंदर सिंगनं जबरदस्त लाइव्ह परफॉर्मन्स दिला होता. हा दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक कन्नन अय्यर, सारा अली खान आणि चित्रपटाचे निर्माते करण जोहर आणि अपूर्व मेहता इथे उपस्थित होते.

'ऐ वतन मेरे वतन' मधील इमरान हाश्मीचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज : 'कतरा कतरा' गाणं समर्पण, निष्ठा आणि आदराच्या भावना जागृत करणारे आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या भारत छोडो आंदोलन (1942) दरम्यान गायब झालेल्या वीरांचं समर्पण आणि त्याग या गाण्यात योग्यप्रकारे सादर केला गेला आहे. कन्नन अय्यर दिग्दर्शित या चित्रपटाची दरब फारुकी यांनी लिहिली आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, ॲलेक्स ओ'नील आणि आनंद तिवारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान चित्रपटातील इमरान हाश्मीच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, तो या पोस्टरमध्ये चष्मा आणि टोपीमध्ये दिसत आहे. आता त्याच्या व्हायरल होत असलेल्या लूकची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे, अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत.

'ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाबद्दल :दरम्यान सुखविंदर सिंगनं 'कतरा कतरा' या गाण्याबद्दल म्हटलं, ''या गाण्याचं माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. 'कतरा कतरा' गाणं देशभक्तीचं जागृत करत नाही तर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची भावना आणि शक्ती देखील यात सामील आहे. मुकुंद सूर्यवंशी, रवी गिरी आणि रोहन देशमुख यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं खूप उत्तम आहे. देशासाठी शौर्य दाखवणाऱ्या त्या सर्व गायब वीरांना या गाण्याद्वारे आदरांजली वाहली गेली आहे. 'ऐ वतन मेरे वतन'शी जोडला गेल्यानं मला खूप आनंद होत आहे. या चित्रपटातची अनोखी कहाणी आहे.'' 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट भारतात आणि जगभरातील 240 पेक्षा जास्त देशात 21 मार्च रोजी हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड डबींगसह प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. ‘टू किल अ टायगर’ भारतीय कलाकृतीला 'ऑस्कर'ची हुलकावणी, प्रियांका चोप्राचं चित्रपटाशी खास आहे कनेक्शन
  2. कलादिग्दर्शक नितीन देसाईंना ऑस्कर सोहळ्यात 'इन मेमोरिअम'मध्ये आदरांजली
  3. Oscars 2024 Winners List : ओपेनहाइमरनं पटकाविले सात पुरस्कार, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

ABOUT THE AUTHOR

...view details