महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Elvish Yadav Arrested : रेव्ह पार्टी प्रकरणात YouTuber एल्विश यादवला अटक; नोएडा पोलिसांची कारवाई - Police arrested Elvish Yadav

Police Arrested Elvish Yadav : नोएडा पोलिसांनी यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी दोनचा विजेता एल्विश यादवला अटक केलीय. सापाचं विष तस्करी प्रकरणी तसंच रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनी यादवला अटक केलीय.

Police arrested Elvish Yadav
एल्विश यादवला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 4:25 PM IST

Updated : Mar 17, 2024, 6:49 PM IST

नवी दिल्ली Police Arrested Elvish Yadav : यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी दोनचा विजेता एल्विश यादवबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सापाचं विष तस्करी प्रकरणी नोएडा पोलिसांनी यादवला अटक (Elvish Yadav arrested by Noida Police) केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विशची सेक्टर 113 मध्ये पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच पाच जणांना अटक केली होती.

एल्विश यादवला न्यायालयीन कोठडी : अटक केल्यानंतर एल्विश यादवला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी एल्विश यादवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयानं सुनावली आहे.

एल्विश यादवला अटक :याप्रकरणी डीसीपी नोएडा विद्या सागर मिश्रा यांनी सांगितलं की, ''नोएडा पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादवला अटक केलीय. दिल्ली-एनसीआरमधील पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी एल्विश यादवसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी आधी तक्रार दाखल केली होती." पोलिसांनी यापूर्वी एल्विश यादवची चौकशी केली होती.

ऑडिओ क्लिपमध्ये एल्विशचं नाव आलं समोर : या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं एल्विशनं स्पष्ट केलंय. मात्र, एका ऑडिओ क्लिपमध्ये एल्विशचं नाव समोर आलं होतं. ऑडिओमध्ये, अटक आरोपी राहुल यादवसाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीनं मेनका गांधींची संघटना पीपल्स फॉर ॲनिमल्सला याप्रकरणाबद्दलची माहिती दिली. यानंतर एल्विशला दोषी समजण्यात आलं. पूर्णपणे पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं एल्विशनं एका विधानामध्ये सांगितलं होतं.

हेही वाचा :

  1. Ed Sheeran : ग्लोबल सिंगर एड शिरीन कॉन्सर्टनंतर मुंबई विमानतळावर झाला स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल
  2. पुलकित सम्राटच्या दिल्लीतील घरी क्रिती खरबंदाचा भव्य गृह प्रवेश, पाहा व्हिडिओ
  3. Shah Rukh Khan on Airport : शाहरुख खानचा शाही अंदाज, विमानतळावरील नवा लूक चर्चेत!
Last Updated : Mar 17, 2024, 6:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details