मुंबई - Honey Singh and Zaheer Iqbal : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं. सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्यावर आता लग्नाच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. या लग्नाला अनेक बॉलिवूडमधील कलाकार उपस्थित होते, त्यापैकी एक सर्वात लोकप्रिय रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग देखील यावेळी स्पॉट झाला. हनी सिंगनं त्याची बेस्ट फ्रेंड सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचा खूप आनंद लुटला आणि बरीच गाणीही गायली. याशिवाय त्यानं सोनाक्षीचा पती झहीरला एक इशारा दिला आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या हनी सिंगनं लावली हजेरी :सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हनी सिंगला, जेव्हा पापाराझीनं विचारलं, तेव्हा हनी सिंगनं सांगितले की, "एका वर्षानंतर सोनाक्षीच्या लग्नात त्यानं खूप मद्यपान केलं. माझ्या आईला कळले तर ती मला खूप मारेल." यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "मी सोनाक्षी सिन्हासाठी खूप आनंदी आहे आणि झहीर इक्बाल खूप चांगला माणूस आहे. जर झहीरनं सोनाक्षीला खूश ठेवले नाही तर मी त्याला बघून घेईन.," असं त्यानं मस्करी करत म्हटलं.