मुंबई - Dolly Chaiwala : सोशल मीडियाने अनेकांना रस्त्यावरून उचलून मोठे स्टार बनवले आहे. नागपूरच्या जगप्रसिद्ध डॉली चायवाला याला आज सर्वजण ओळखतात. जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स स्वतः येऊन त्यांच्या स्टॉलवर चहा प्यायला आले, तेव्हा तो जगभर प्रसिद्ध झाला. डॉली गेली 14 वर्षांपासून चहा विकत आहे. आज त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यानं खूप संघर्ष केला आहे. डॉलीची चहा विकण्याची शैली खूपच वेगळी आहे. त्यामुळे अनेकजण त्याचा चहा पिण्यासाठी आवर्जून जातात. डॉली चायवाला आता क्वालिटी टाईम घालविण्यासाठी परदेशात गेला आहे.
डॉली चायवाला गेला परदेशात : काल 27 मार्च रोजी डॉली चायवाला मालदीवला गेला. आता मालदीवमध्ये त्याची भेट सलमान खानचा भाऊ सोहेल खानशी झाली. डॉली चायवालानं मालदीवमध्ये सोहेल खानबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ''मालदीवमध्ये सोहेल खान सरांना भेटलो. सर तुम्हाला भेटून खूप बरे वाटले.'' आता डॉलीनं शेअर केलेल्या फोटोंवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. या पोस्टवर एका युजरनं लिहिलं, ''हा भारताचा दुसरा चायवाला पंतप्रधान बनेल.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''आता काय वेळ आली आहे डॉली चायवाल्याबरोबर सेलिब्रिटी फोटो काढण्यासाठी येत आहेत.'' आणखी एकानं लिहिलं, ''डॉली नक्की बिग बॉसमध्ये जाणार.'' या पोस्टवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.