मुंबई - Kalki 2898 AD First Song Promo out :प्रभास स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'कल्की 2898 एडी'चं पहिलं गाणं भैरव थीमवर आहे. आता या गाण्याचा प्रोमो आज 15 जून रोजी रिलीज झाला आहे. हे गाणे पंजाबी स्टार दिलजीत दोसांझनं गायलं आहे. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 600 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपचाकडून अनेकांना खूप अपेक्षा आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहेत. या गाण्याचे पोस्टर 14 जून रोजी शेअर करण्यात आले होते. या पोस्टमध्ये प्रभास दिलजीतबरोबर दिसत होता. या गाण्याला संगीतकार संतोष नारायण यांनी संगीत दिलं आहे.
'कल्की 2898 एडी'मधील पहिल्या गाण्याचा प्रोमो रिलीज : दरम्यान शेअर केलेला गाण्याचा प्रोमो हा खूप दमदार आहे. या प्रोमोमध्ये पंजाबीमध्ये दिलजीत बोल गात आहे. 'कल्की 2898 एडी' हा नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात अनेक सुपरस्टार दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त , दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेतस असणार आहेत. याशिवाय या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार कमल हासन खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. नुकताच 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर रिलीज झाला होता .याशिवाय सर्व स्टार कास्टचा फर्स्ट लूक समोर आला आहे. नाग अश्विन बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटावर काम करत आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाची रिलीज डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली होती.