महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सनी देओल स्टारर 'बॉर्डर 2'मध्ये वरुण धवननंतर दिलजीत दोसांझची झाली एन्ट्री, वाचा सविस्तर - Sunny Deol Border 2 - SUNNY DEOL BORDER 2

Diljit Dosanjh in Border 2: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिलजीत हा सनी देओल स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'बॉर्डर 2'मध्ये दिसणार आहे.

Diljit Dosanjh in Border 2
'बॉर्डर 2'मध्ये दिलजीत दोसांझ (दिलजीत दोसांझ 'बॉर्डर 2' (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 4:13 PM IST

मुंबई -Diljit Dosanjh Border 2 :अभिनेता सनी देओल स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'बॉर्डर 2'च्या स्टारकास्टची नावे एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. सनी देओल स्टारर 'बॉर्डर 2'मध्ये वरुण धवनची एन्ट्री झाल्यानंतर आणखी एक बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचं काम खूप वेगानं सुरू असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या चित्रपटात पंजाबी स्टार आणि ग्लोबल सिंगर दिलजीत दोसांझनं एन्ट्री केली आहे. सनी देओलनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटात दिलजीत दोसांझच्या एन्ट्रीची घोषणा केली आहे. यापूर्वी सनीनं वरुणच्या एन्ट्रीची घोषणाही केली होती.

'बॉर्डर 2'मध्ये दिलजीत दोसांझ दिसेल :'बॉर्डर 2'च्या निर्मात्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये वरुण धवनप्रमाणेच दिलजीत दोसांझचंही चित्रपटात स्वागत केलं आहे. अनुराग सिंग 'बॉर्डर 2'चं दिग्दर्शन करत आहेत. 'बॉर्डर 2'चे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता, निधी दत्ता आहेत. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी रिपब्लिक वीकेंडला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सनी, वरुण आणि दिलजीत यांच्याशिवाय आणखी किती स्टार्स या चित्रपटात एन्ट्री करणार आहेत, याची वाट प्रेक्षक पाहात आहेत. 'बॉर्डर 2'बद्दल आणखी काही घोषणा काही दिवसातचं होईल. दरम्यान या चित्रपटात दिलजीत दोसांझ हा सैनिक बनून शत्रूंशी लढणार आहे.

सनी देओलची पोस्ट :याआधी, सनी देओलनं 12 जून 2024 रोजी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टमध्ये लिहिलं होतं, "उद्या एक रोमांचक घोषणा होणार आहे, तुम्ही सांगू शकता का? ,या पोस्टवर सनीच्या चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. 13 जून रोजी 'बॉर्डर 2' या चित्रपटाची घोषणा झाली, यानंतर सिनेजगतात खळबळ उडाली. बॉर्डर चित्रपटाचा सीक्वल 27 वर्षांनंतर येत आहे. दरम्यान ऑगस्ट 2023 रोजी रिलीज झालेल्या सनीच्या 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 600 कोटींचा व्यवसाय केला होता. 'गदर 2' हा सनी देओलच्या कारकिर्दीतील सर्वात हिट आणि फायदेशीर चित्रपट ठरला. 'गदर 2'चं यश पाहून 'बॉर्डर'च्या निर्मात्यांनी सनीबरोबर 'बॉर्डर 2' हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा :

  1. मेघना गुलजारच्या चित्रपटापाठोपाठ आयुष्मान खुराना सनी देओलच्या चित्रपटातून पडला बाहेर - Ayushmann Khurrana
  2. 'बॉर्डर 2' ची रिलीज डेट ठरली, थिएटरमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा - Border 2 Release Date
  3. 'बॉर्डर 2'ची घोषणा, 27 वर्षांनंतर सनी देओल त्याच्या 'जवानां'सह परतणार - Sunny Deol to

ABOUT THE AUTHOR

...view details