महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दिलीप प्रभावळकर शेअर करणार डॉ. श्रीराम लागूंच्या पत्रांच्या आठवणींचा सुगंध - Dilip Prabhalkar - DILIP PRABHALKAR

पत्र लिहिणं, वाचणं अथवा येणं ही गोष्ट आता इतिहास जमा झाल्यासारखी आहे. परंतु आलेल्या पत्रांमधील आठवणींचा सुगंध जपण्याचं काम काहीजण करत असता. मराठीतील ज्येष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर यांच्या हृदयात वास्तव केलेला डॉ. श्रीराम लागूंच्या पत्रांच्या आठवणींचा गंध ते रसिकांबरोबर पुन्हा एकदा शेअर करणार आहेत.

Dilip Prabhalkar
दिलीप प्रभावळकर (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 4:22 PM IST

मुंबई - कालानुरूप समाजात अनेक बदल घडत असतात. पूर्वी विशिष्ट सायकलची घंटी दारात वाजली की पोस्टमन पत्र घेऊन आलाय हे समजत असे. आता हातातील मोबाईलची घंटी वाजली की पत्रवजा संदेश आल्याचे कळते. पत्र लिहिणे, वाचणे अथवा येणे ही गोष्ट आता कालातीत झाल्यासारखी आहे. त्यामुळेच पत्रं आणि त्याभोवती घुटमळणाऱ्या आठवणी यांचा विसर पडत चाललेला असताना जेष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी मराठी रसिकांसाठी त्यांना आलेल्या पत्रांचे वाचन करण्याचा अभिनव प्रयोग 'पत्रा पत्री' या कार्यक्रमाद्वारे सादर केला आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या हृदयात वास्तव केलेला डॉ. श्रीराम लागूंच्या पत्रांच्या आठवणींचा गंध ते रसिकांबरोबर पुन्हा एकदा शेअर करीत आहेत. या प्रयोगांच्या सादरीकरणात पत्रांचे अभिवाचन केले जाते ज्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

दिलीप प्रभावळकर (Etv Bharat)


आपल्या प्रिय व्यक्तीचे हरवलेले पत्र जेव्हा पुन्हा मिळते तेव्हा होणारा आनंद शब्दात वर्णन करणे कठीण आहे. त्या लहानशा कागदाच्या कुशीत अनेक भावना दडलेल्या असत. आजच्या काळात पत्रलेखन कमी झाले असले तरी काही पत्रांच्या आठवणी अजूनही मनात घर करून राहिल्या आहेत. अभिनेता दिलीप प्रभावळकर यांच्या मनात डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेल्या पत्राच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ‘हसवाफसवी’ हे नाटक पाहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या आठवणी आजही त्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतात.



दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे प्रयोग सध्या जोरात चालू आहेत. यासाठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची त्यांना साथ मिळाली आहे. दिलीप प्रभावळकर म्हणाले की, "पत्रांमधील भावनांचा ओलावा आणि शब्दांमधील आपलेपणाची अनुभूती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने 'पत्रा पत्री’ चा जन्म झाला. या पात्रांच्या अंतरंगात कथा दडलेल्या आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना भावतील अशा पाच पत्र-कथांची आम्ही निवड केली."

दिलीप प्रभावळकर (Etv Bharat)



या ‘दृक आविष्कारा’चे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले असून रंगावृत्ती नीरज शिरवईकर यांची आहे. संगीत अजित परब यांनी दिले आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांनी केली आहे तर वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा बनून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे पत्रांचे अभिवाचन करतात. माधुरी गवांदे आणि निनाद कर्पे याचे निर्माते आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details