महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पुष्पा' चित्रपट बनण्यापूर्वी वेब सिरीज करण्याचा होता विचार, दिग्दर्शकानं केला खुलासा - अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा

Pushpa Movie : अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा' चित्रपट बनवण्यापूर्वी या विषयावर वेब सीरीज बनवण्याचा विचार दिग्दर्शक सुकुमार करत होते. याबद्दल त्यांनी आता याबद्दल खुलासा केला आहे.

Pushpa Movie
पुष्पा चित्रपट

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 5:39 PM IST

Updated : Feb 19, 2024, 6:12 PM IST

मुंबई - Pushpa Movie :अल्लू अर्जुन सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा 2'साठी चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ऑगस्टमध्ये यावर्षी प्रदर्शित होणार आहे. 2021 मध्ये 'पुष्पा'चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. आता चाहते दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहे. सुकुमार हे पहिल्यांदा 'पुष्पा' ही वेबसीरीज बनवण्याचा विचार करत होते, अशी माहिती समोर आता आली आहे. सुकुमारनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते याआधी 'पुष्पा' ही वेब सीरीज बनविण्याच्या विचारात होते. पण नंतर आम्ही विचार केला की हा एक संपूर्ण चित्रपट बनवू. प्रथम प्रेक्षकांसमोर एक अद्भुत अनुभव मांडूया, असा विचार केला.''

पुष्पा 2 यावर्षी थिएटरमध्ये होईल दाखल : 'पुष्पा 2' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट यावर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन पुन्हा आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत क्रेझ आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. रुपेरी पडद्यावर हा चित्रपट 15 ऑगस्टला दाखल होणार आहे. या दिवशी अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' देखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'पुष्पा 2' च्या आधीही अल्लू अर्जुननं 'पुष्पा 3'बद्दल दिली अपडेट : आतापर्यंत चाहते 'पुष्पा २' ची वाट पाहत आहेत. मात्र याच दरम्यान अल्लू अर्जुननं चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिलं आहे. अलीकडेच एका मुलाखतीत अल्लू अर्जुननं चित्रपटाच्या पुढच्या भाग 'पुष्पा 3'बाबत एक मोठे अपडेट दिले आहे. त्यानं म्हटलं की, ''चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तुम्ही नक्कीच अपेक्षा करू शकता. आम्हाला ही फ्रँचायझी बनवायची आहे. आमच्याकडं लाइनअपसाठी अनेक रोमांचक कल्पना आहेत.'' दरम्यान 'पुष्पा 3'ची कहाणी कशी असणार याबद्दल अद्याप काहीही समोर आलेलं नाही आहे.

हेही वाचा :

  1. "मला ऐकू येतंय, मी बहिरा नाही..." म्हणत करण जोहरवर भडकला रणबीर कपूर, व्हिडिओ व्हायरल
  2. हळवी भावनिक प्रेमकथा असलेल्या 'ऊन सावली' चित्रपटाचा टीझर रिलीज
  3. मृत्यूच्या खोट्या बातमीबद्दल नोटीस मिळाली का? पूनम पांडेनं केला खुलासा
Last Updated : Feb 19, 2024, 6:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details