महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कॉपीराईट प्रकरणी नयनताराविरोधात धनुषची कोर्टात धाव, आता अभिनेत्रीला द्यावं लागणार उत्तर - DHANUSH VS NAYANTHARA CONTROVERSY

अभिनेता धनुषनं कॉपीराइट प्रकरणी कोर्टाचा सहारा घेतला आहे. नयनतारा आणि तिच्या पतीला यावर कायदेशीर उत्तर द्यावं लागणार आहे.

Dhanush moves court against Nayanthara
नयनताराविरोधात धनुषची कोर्टात धाव (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 27, 2024, 3:40 PM IST

मुंबई - साऊथचा सुपरस्टार धनुष यानं नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश सिवन यांच्याविरोधात कॉपीराइट प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धनुषनं नयनतारावर 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' या डॉक्युमेंटरीमध्ये त्याच्या चित्रपटातील व्हिज्युअल वापरल्याचा आरोप केला आहे. नयनतारा आणि विघ्नेश सिवन यांच्या विरोधात धनुषनं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड ही धनुषची फिल्म प्रॉडक्शन कंपनी नयनतारा आणि विघ्नेशची कंपनी राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड विरोधात कोर्टात गेली आहे. धनुषच्या कंपनीनं मद्रास उच्च न्यायालयात एक अर्ज देखील दाखल केला आहे, ज्यामध्ये धनुषनं लॉस गॅटोस प्रॉडक्शन सर्व्हिसेस इंडिया एलएलपी विरुद्ध खटला चालवण्याची परवानगी देखील मागितली आहे. चित्रपट आणि मालिका भारतात नेटफ्लिक्सवर

लॉस गॅटोस प्रॉडक्शन सर्व्हिसेस इंडिया एलएलपीच्या माध्यमातून भारतात नेटफ्लिक्सवर चित्रपट आणि मालिका प्रसारित केल्या जातात. दरम्यान 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' ही नयनताराची डॉक्युमेंटरी 18 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित केली जात आहे.

धनुषनं मुंबईस्थित कंपनी लॉस गॅटोस प्रॉडक्शन सर्व्हिसेस इंडिया एलएलपी विरुद्ध लेटर्स पेटंटचे कलम १२ वापरण्याचे आवाहन केलं आहे. त्याचबरोबर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं ही मान्यता दिली आहे. आता पुढील सुनावणीत नयनताराला याचं कायदेशीर उत्तर द्यावं लागणार आहे.

संपूर्ण वाद जाणून घ्या?

नयनताराच्या दीर्घ पोस्टमध्ये अलीकडेच धनुषने तिला कॉपीराइट प्रकरणी 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवल्याचे समोर आले होते. यापूर्वी नानुम राउडी धन या चित्रपटाची निर्मिती धनुषनं केली होती. नयनताराने या चित्रपटाची काही दृश्ये तिच्या डॉक्युमेंटरी मालिकेत परवानगीशिवाय वापरली आहेत. यासाठी तिनं धनुषकडे परवानगीसाठी विनंती केली होती. मात्र त्यानं नकार देऊनही तिनं ही दृष्य थेट डॉक्युमेंटरीमध्ये वापरण्यात आली आहेत. तेव्हापासून हे प्रकरण पूर्णपणे तापले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details