मुंबई - Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. यावर्षी ती तिच्या चाहत्यांना खुशखबर देणार आहे. दरम्यान, मेट गाला 2024 देखील सुरू आहे, मात्र मेट गालाला जाण्याऐवजी, दीपिका पती रणवीर सिंगबरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी बाहेर गेली आहे. रणवीर सिंगनं वडील होण्यापूर्वीच सोशल मीडियावरून त्याच्या लग्नामधील सर्व फोटो डिलीट केले होते. यानंतर रणवीर हा प्रसिद्धीझोतात आला होता. आता दीपिकानं सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाच्या 'पिकू' चित्रपटाला आज 8 मे रोजी 9 वर्षे पूर्ण झाले आहेत. या विशेष प्रसंगी तिनं 'पिकू'च्या सेटवरचा एक पोस्ट शेअर लिहिलं, "मला लोकांना सांगायला आवडते की मी किती खाते."
दीपिका पदुकोण शेअर केली पोस्ट :या फोटोमध्ये तिच्याबरोबर अभिनेता अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेता इरफान खान देखील दिसत आहेत. फोटोत बिग बी, इरफान खान आणि दीपिका आपापल्या भूमिकेत खुर्चीवर बसले आहेत. सुजित सरकार दिग्दर्शित 'पिकू' हा चित्रपट अनेकांना आवडला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 8 मे 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची संपूर्ण कहाणी अमिताभ बच्चन, इरफान खान आणि दीपिका पदुकोण यांच्याभोवती फिरणारी होती. आता दीपिकानं शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. हा फोटो पाहून अनेकांना इरफान खानची आठवण झाली आहेत. या फोटोवर चाहते इरफान आणि चित्रपटाबद्दल कौतुक करत आहेत.