मुंबई - Deepika Padukone :अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या गरोदरपणाचे दिवस एन्जॉय करत आहे. ती वेगवेगळ्या कामात गुंतत असून तिनं आता इंस्टाग्रामवर तिच्या नवीन छंदाची एक झलक शेअर केली आहे. यामध्ये ती थ्रेड डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 16 एप्रिल रोजी दीपिकानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आशा आहे की मी पूर्ण केलेली आवृत्ती शेअर करू शकेन!'' फोटोमध्ये दीपिकानं केलेलं भरतकाम दिसत आहे. यावर तिनं हिरव्या पानांसह फुलांच्या पाकळ्यामध्ये सुंदर असं कौशल्य आपले दाखवले आहे. ती सध्या भरतकाम शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
दीपिका पदुकोण शिकत आहे भरतकाम :दीपिकानं बाळाच्या आगमनापर्यंत स्वत: ला निरोगी आणि व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं भरतकाम शिकण्याचा निर्णय घेतला असून ती हे काम लवकरच शिकेलं असा सध्या दिसत आहे. दीपिकाच्या या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहेत. तिनं केलेली एम्ब्रॉयडरी पाहून एका यूजरनं कमेंट विभागात लिहिलं, 'मला वाटते ही फुलकरी आहे, जेव्हा आई गरोदर असते आणि मुलाचे आगमन होते तेव्हा ही भेट मुलाला दिली जाते.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'दीपिका खूप हुशार आहे ती लवकरच हे काम शिकेल.' तसेच आणखी एकानं या पोस्टच्या कमेंट विभागात लिहिलं, 'तू भरतकाम अगदी योग्य करत आहे.' याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी जोडत आहेत.