मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री नयनतारा आणि धनुष यांच्यातील वाद बऱ्याचं दिवसांपासून सुरू असल्याचं दिसत आहे. नयनतारानं 16 नोव्हेंबर रोजी एका खुल्या पत्रात धनुषला फटकारलं होतं. नयनताराला तिच्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' माहितीपटासाठी धनुषच्या' नानुम राउडी धान' चित्रपटातील एका गाण्याचं व्हिज्युअल वापराचे होते, परंतु धनुषनं यासाठी नकार दिला. यानंतर जेव्हा धनुषनं 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' या माहितीपटाच्या ट्रेलरमधील त्याच्या चित्रपटातील 3 सेकंदाचे दृश्य पाहिले, तेव्हा त्यानं नयनताराला 10 कोटी रुपयांची नोटीस पाठवली. यानंतर नयनतारानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर धनुषच्या नावानं एक खुले पत्र लिहिले होते. तरीही धनुषनं कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं आहे.
धनुषच्या वकिलाचे पत्र : धनुषच्या वकिलाच्या वतीनं याप्रकरणी आपलं म्हणणं मांडलं आहे. नयनताराच्या डॉक्युमेंट्रीसाठी धनुषच्या वकिलानं नेटफ्लिक्सला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. नयनताराचा डॉक्युमेंटरी न हटवल्यास कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल, असंही यात सांगण्यात आलंय. धनुषच्या वकिलाचे हे वक्तव्य फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहे. या विधानानं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. या दोन्ही सुपरस्टार्समध्ये आता वाद वाढताना दिसत आहेत. धनुषच्या वकिलानं निवेदनात लिहिलं, 'माझे क्लायंट हे एक चित्रपट दिग्दर्शक आहे. त्यांनी कुठे पैसे खर्च केले आहे, हे त्यांना माहित आहे. 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' या माहितीपटासाठी माझ्या क्लायंटला पैसे दिले गेले नाही, तरीही ते त्याच्या चित्रपटामधील फुटेजचा वापर करत आहे. माझ्या क्लायंटनं त्यांच्या चित्रपटातील फुटेज घेण्यासाठी कोणालाही सांगितलं नाही. नयनताराला आता पुरावे सादर करावे लागणार आहेत.'
धनुष करणार कायदेशीर कारवाई : धनुषच्या वकिलानं पुढं म्हटलं , 'माझ्या क्लायंटला नयनतारानं खुल्या पत्रातून व्यक्त केलेले विचार योग्य वाटत नाही. हे फुटेज माझे क्लायंट (धनुष)चे आहे. सध्या धनुषच्या वकिलानं नयनताराला ती क्लिप डॉक्युमेंटरीमधून काढून टाकण्यास सांगितलं आहे. ही क्लिप कॉपीराइटचे पूर्णपणे उल्लंघन आहे, जर ती काढली नाही नयनतारावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर धनुषच्या वकिलानं यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. नयनताराच्या आगामी चित्रपटाच्या अपडेट्सबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.