मुंबई- Crew X Review: तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन अभिनीत 'क्रू' चित्रपट आज स्क्रीनवर झळकला. महिला कलाकार मुख्य भूमिकेत असलेला अखेरचा चित्रपट यापूर्वी थिएटरमध्ये हिट झाला होता हे आठवणे कठीण आहे. या प्रकारातील चित्रपट म्हणजे 'वीरे दी वेडिंग' हा एकता कपूर आणि रिया कपूर यांचा कॉमेडी चित्रपट 2028 मध्ये प्रदर्शित झाला होता. जवळजवळ सहा वर्षांनंतर, याच चित्रपटाचे निर्माते महिलांच्या मुख्य भूमिकेसह आणखी एका विचित्र मनोरंजनासह प्रेक्षकांना आनंदित करत आहेत.
16 मार्च रोजी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 'क्रू' बद्दलची अपेक्षा वाढली. 'लूटकेस' आणि TVF 'ट्रिपलिंग' या चित्रपटासाठी ओळखला जाणाऱ्या चित्रपटाचा दिग्दर्शक राजेश ए कृष्णनच्या 'क्रू'ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'क्रू' चित्रपटाचा पहिल्या दिवशी पहिला शो पाहिल्यानंतर X वर नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
स्क्रिनिंगनंतर, नेटिझन्सनी या चित्रपटावर त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी X वर प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. चित्रपटाची निर्विवाद ऊर्जा, त्यातील प्रमुख महिलांच्या करामती आणि प्रसंगिक विनोदांची रेलचेल आणि कथेच्या नव्या विषयानं प्रेक्षकांची मने जिंकल्याचं दिसते.
118 मिनिटांच्या त्रू चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून UA प्रमाणपत्र मिळाले आहे. सर्व वयोगटाच्या मुलांना पाहाता येऊ शकेल अशा एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स आणि रिया कपूरच्या फिल्म अँड कम्युनिकेशन्स नेटवर्कने निर्मिती केलेला 'क्रू' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
X वरील युजर्स 'क्रू' एक परिपूर्ण जॉयराइड असल्याचं सांगत कौतुक करत आहेत. यातील नवीन संकल्पनेची आणि मजेदार वन-लाइनर्सची प्रशंसा करत आहेत. तब्बू, करीना आणि क्रिती यांच्या अभिनयामुळे चित्रपटाने आणखी एक उंची गाठली आहे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे, खिळवून ठेवणारे आणि पूर्ण मनोरंजन करणारे स्मार्ट आणि चपखल कथन तयार केल्याबद्दल राजेश कृष्णन यांच्या दिग्दर्शनाचे देखील नेटिझन्स कौतुक करत आहेत.