मुंबई- Crack trailer release : 'क्रॅक - जीतेगा तो जियेगा'चा धडकी भरवणारा टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला होता, त्यानंतर चाहते या अॅक्शन स्पोर्ट्स ड्रामा ट्रेलरची प्रतीक्षा करत होते. देशातील अॅक्शन सुपरस्टार विद्युत जामवालने पॉवरहाऊस कलाकारांसह त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज ९ फेब्रुवारी रोजी लाँच केला. चित्रपट निर्माता आदित्य दत्त दिग्दर्शित या चित्रपटात विद्युत जामवाल, अर्जुन रामपाल, नोरा फतेही आणि एमी जॅक्सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हा चित्रपट जबरदस्त अॅक्शन, थ्रिल आणि विविध स्पोर्ट्स स्टंट यांनी खच्चून भरलेला आहे. हा भारतातील पहिला अॅक्शन स्पोर्ट्स ड्रामा असल्याचे प्रमोशन निर्मात्यांकडून सुरू आहे. उत्कृष्ट निर्मिती मूल्यासह हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
अभिनेता विद्युत जामवालने ट्रेलर लाँचच्या वेळी क्रॅक थीमवर आधारित गेम देखील लॉन्च केला. या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेता-निर्माता विद्युत जामवाल म्हणाला, "क्रॅक चित्रपटाच्या माध्यमातून, भारतीय चित्रपटातील सर्वात मोठा स्पोर्ट्स अॅक्शन थ्रिलर सादर करण्याचे माझे ध्येय होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या ध्येवेड्या टीमचा मी आभारी आहे. आम्ही तयार केलेले थ्रिल-पॅक व्हिज्युअल प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या उद्देशाने बनवले आहेत. यामुळे प्रेक्षक उत्सुकतेने चित्रपटाचा आणखी आनंद घेऊ शकतील."