मुंबई -Mirzapur Season 3 Trailer :'मिर्झापूर'चा तिसरा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. 'मिर्झापूर 3'ची नुकतीच पोस्टरसह घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून चाहते 'मिर्झापूर सीझन 3'च्या रिलीजची वाट पाहत आहेत. 'मिर्झापूर सीझन 3' 5 जुलैमध्ये रिलीज होणार आहे. याआधी या क्राईम थ्रिलर सीरिजच्या ट्रेलर रिलीजची डेट समोर आली आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'मिर्झापूर सीझन 3'च्या ट्रेलरची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. याआधी निर्मात्यांनी 'मिर्झापूर 3'चं मल्टीस्टार पोस्टर देखील शेअर केले होते. दरम्यान या सीझनच्या ट्रेलर रिलीजची डेट जाहीर करताना निर्मात्यांनी लिहिलं, "छल कपट, शह-मात मिळेल, एक झलक खुर्चीच्या खेळाशी."
'मिर्झापूर 3' ट्रेलरची रिलीज डेट :'मिर्झापूर 3'चा ट्रेलर 20 जूनला रिलीज होणार आहे. निर्मात्यांच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होत आहे की, या वेब सीरीजच्या ट्रेलरमध्ये एक मोठा धक्कादायक खुलासा होणार आहे. 'मिर्झापूर सीझन 3'ची रिलीज डेट 11 जून रोजी जाहीर करण्यात आली होती. या वेब सीरीजमध्ये पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर आणि विजय वर्मा कलाकार पुन्हा एकदा त्यांच्या दमदार शैलीत दिसणार आहे. 'मिर्झापूर 3'मध्ये काही नवे कलाकारही दिसणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी 'मिर्झापूर 3'मध्ये धमाका होताना दिसेल असे काही युजर्स पोस्टवर प्रतिक्रिया देऊन म्हणत आहेत.