मुंबई - Animal On OTT :रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'अॅनिमल'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटानं जगभरात 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा चित्रपटगृहात झळकला होता. 'अॅनिमल' पाहण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटच्या तिकिटामध्ये कपात केला होता. 'अॅनिमल'ची तिकिटं 100 रुपये करण्यात आली होती. दरम्यान 'अॅनिमल' आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट निश्चित झाली आहे.
ओटीटीवर 'अॅनिमल' प्रदर्शित होईल :आज 25 जानेवारी रोजी नेटफ्लिक्स इंडियानं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि एक्स हँडलवर 'अॅनिमल'ची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'अॅनिमल'साठी तयार राहा, हा चित्रपट 26 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. 'अॅनिमल' चित्रपट हिंदी तसंच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.'' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. 'अॅनिमल' चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.