मुंबई - Padma Vibhushan Chiranjeevi : मेगास्टार चिरंजीवी यांना गुरुवारी भारत सरकारच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांनाही हा सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या दोन्ही कलाकारांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. देशाची राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.
प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कारांची झाली होती घोषणा
यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळीच करण्यात आली होती. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चिरंजीवींनी या विशेष सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना लिहिले होते, 'ही बातमी ऐकल्यानंतर मी आश्चर्य चकित झालो. मला याचा खूप आनंद झाला आहे, मी या सन्मानाप्रती नम्र आणि कृतज्ञ आहे. माझे चाहते, प्रेक्षक, माझ्या भावंडांचे आणि कुटुंबीयांचे अमूल्य प्रेम मला इथपर्यंत घेऊन आले आहे. या सगळ्याशिवाय मी काहीच नाही, मी माझ्या आयुष्याचा आणि या क्षणासाठी कायमचा ऋणी आहे. मी महान नाही हे माहीत असूनही मी नेहमी माझ्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो."
चिरंजीवी हे सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी तेलुगू, हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आतहे. 'विजेता', 'इंद्रा', 'शंकर दादा M.B.B.S.' यासारखे चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहेत. अलिकडेच चिरंजीवी 'भोला शंकर' चित्रपटामध्ये दिसले होते. त्यांनी 1978 साली 'पुनाधिरल्लू' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि तेव्हापासून ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. चिरंजीवी हे साउथ सुपरस्टार राम चरण यांचे वडील आणि अल्लू अर्जुन, अल्लू सिरिश, वरुण तेज, निहारिका आणि साई धरम तेज यांचे काका आहेत.
पंतप्रधान मोदींनी केले वैजयंती माला यांचे अभिनंदन