महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'महाराजा' पाहताना चीनी प्रेक्षकांच्या भावना अनावर, रडणाऱ्या प्रेक्षकांचे व्हिडिओ व्हायरल - MAHARAJA RELEASED IN CHINESE

विजय सेतुपतीचा 'महाराजा' सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

Chinese audience watching 'Maharaja'
'महाराजा' पाहताना चीनी प्रेक्षक ((Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 4, 2025, 5:05 PM IST

मुंबई - साऊथ अभिनेता विजय सेतुपतीच्या 'महाराजा' चित्रपटानं भारतीय प्रेक्षकांना भुरळ घातली होती. गेल्या वर्षी हा सिनेमा 14 जून 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितिलन समीनाथन यांनी केलं होतं. तमिळ भाषेत बनलेला हा चित्रपट हिंदीत डब करून प्रदर्शित झाल्यावर खळबळ उडाली होती. अवघ्या 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जगभरात 200 कोटींचा व्यवसाय केला. आता महाराजा नुकताच चीनमध्ये रिलीज झाला आहे. भारताप्रमाणेच चीनमध्येही महाराजा चित्रपटाच्या आपल्या इमोशनल कथानकानं चीनी प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी आणलं आहे. आता चीनी थिएटरमधील रडणाऱ्या प्रेक्षकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये चिनी प्रेक्षक रडले

चीनच्या चित्रपटगृहांमध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की बाप आणि मुलीची हृदयस्पर्शी कथा असलेल्या महाराजा चित्रपटानं चीनी प्रेक्षकांना हादरवून सोडलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून चिनी प्रेक्षक हैराण झाले असून ते रडताना दिसत आहेत. चित्रपटाच्या शेवटी दर्शविलेले हिंसाचाराचं दृश्य पाहून डोळं झाकणारे अनेक चीनी प्रेक्षक आहेत. यावर कळस म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अनावर झालेले अश्रू वाहतानाही दिसल्यानं आश्चर्य वाटत आहे. हा व्हिडिओ गब्बर नावाच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'चीनमध्ये कुठेतरी बाप-मुलीच्या कथांवर आधारित चित्रपट चालतात असं दिसतं, दंगल आणि सिक्रेट सुपरस्टारची कथाही सारखीच होती'. विजय सेतुपतीच्या महाराजा चित्रपटानं चीनमध्ये एका आठवड्यात 40.75 कोटींचा व्यवसाय केला आहे. कोविड 19 पासून, महाराजा हा चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे.

महाराजांचे कथानक

महाराजाची कथा खूप साधी पण गुंतागुंतीची आहे. सलून चालवणारा एक सामान्य माणूस त्याचा एक डबा हरवल्याची पोलिसात तक्रार करतो. या डब्याच्या मागे त्याच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांची नावे दडलेली आहेत. क्लायमॅक्समध्ये डब्याबरोबर गुन्हेगार सापडल्यानंतर अनेक धक्कादायक रहस्यांचा उलगडा होत जातो. चित्रपटाच्या या क्लायमॅक्सने प्रेक्षकांचे मन हेलावलं होतं.

ABOUT THE AUTHOR

...view details