मुंबई - 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४' सध्या जोरदार सुरु आहे. या फेस्टिव्हमध्ये अनेक दिग्गज कलाकार मंडळी आपल्या फॅशनचा जलवा दाखवत आहेत. कान्सच्या रेड कार्पेटवरील अनेक अभिनेत्रींचे हटके लुक व्हायरल होताना दिसताहेत. काल बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन कानच्या रेड कार्पेटवर अवतरली. या आधी अनेक कलाकारांनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपली कला प्रदर्शित करतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले आहेत. अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने सुद्धा सहभाग घेत आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं आहे.
आस्था शाह
आस्था शाहने आपल्या रेड कार्पेटवरच्या फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियामधून समोर आलेल्या फोटोजवरुन लक्षात येतंय की तिने लाइट कॉक कल ऑफ शोल्डर गाउन परिधान केला त्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. आस्थाचे इंस्टाग्रामवर एक मिलियन फॅन्स फॉलोअर्स आहेत. आस्थाने सांगितले की ती कान्स येथे पोहचताच तीचे 1 मिलीयन फॉलोअर्स झाले.
निहारिका एनएम
अभिनेत्री प्रियंका चोपडा तसेच इतर दिग्गज बॉलीवुड स्टार बरोबर काम केलेल्या निहारिकाने पहिल्यांदाचं कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. निहारिकाचे इंस्टाग्रामवर 3.4 मिलियन फॅन्स फॉलोअर्स आहेत. आपल्या ग्रुपसोबत कान्सला गेलेल्या निहारिकाने काल निऑन ड्रेसमधील तिचे सुंदर फोटो शेअर केलं आहे. निहारिकाच्या या ग्लॅमरस लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
आरजे करिश्मा