मुंबई - Bipasha and Karan Anniversary : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार कपल करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू हे नेहमीच सोशल मीडियावर सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. दरम्यान हे जोडपे आज 30 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत. आज या जोडप्यानं एकमेकांवर प्रेम दाखवून काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आता दोघेही या विशेष दिवसाच्या शुभेच्छा एकामेंकाना सोशल मीडियाच्या माध्यामातून देताना दिसत आहेत. बिपाशानं एक पोस्ट शेअर करत पती करणला लग्नाच्या आठव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिलं, "8 व्या मंकी ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. आम्ही आमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस एकत्र आणि कायम साजरा करणे कधीही थांबवणार नाही." या व्हिडिओमध्ये लग्नातील 2016 ते 2024 सालापर्यंतचे विशेष क्षण टिपले आहेत.
करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूनं शेअर केला व्हिडिओ : या व्हिडिओच्या पोस्टमध्ये बिपाशा आणि करणचे चाहते कमेंट करून या जोडप्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हे जोडपे एकत्र खूप खुश दिसत आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये करण आणि बिपाशाची मुलगी देवी देखील आहे. करण आणि बिपाशा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेले आहेत. या जोडप्यानं काही व्हिडिओ आणि फोटो त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. आता करण त्याची मुलगी देवी आणि पत्नीबरोबर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. या जोडप्यासाठी हा दिवस खूप विशेष आहे.